Maharashtra Live Updates : TMC खासदाराचे वादग्रस्त विधानाने नवा वाद, आदित्य ठाकरेंचा आपल्याच कार्यकर्त्यांना दम...
Sarkarnama June 29, 2025 05:45 AM
Kolkata Law College Rape Case : “एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार…”; TMC खासदाराच्या विधानाने वाद पेटला

कोलकातामध्ये एका विद्यार्थिनी बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेनंतर देशभरात संतापाची लात उसळली आहे. ही विद्यार्थिनी लॉ कॉलेजची असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी हा तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता देखील आहे. अशातच याच पक्षाचे खासदार खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ज्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. त्यांनी जर एखाद्या मित्राने मैत्रिणीवर बलात्कार केला तर काय करता येईल? आता शाळा, कॉलेजमध्ये पोलिस तैनात केले जातील का? मित्रानेच मैत्रिणीवर बलात्कार केला तर तो भ्रष्टाचार कसा असू शकतो? जोवर पुरुषांची मानसिकता सुधारत नाही तोवर या घटना घडत राहणार, असे विधान केलं आहे. यावरून आता एकच गदारोळ उडाला आहे.

Pune News : मुंबई जर ठाकरे एकत्र येत असतील तर पुण्यात का नाही?ठाकरे सेनेच्या नेत्यांनी चढली मनसेच्या कार्यालयाची पायरी

शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषा सक्ती विरोधात राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली आहे. येत्या 5 जुलैला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. यामुळे मुंबईत सध्या ठाकरेंच्या मिलनाचा उत्साह पुण्यात पाहायला मिळत आहे. पुण्यात पहिल्यांदाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुण्यातील नेत्यांनी मनसे कार्यालयाची पायरी चढल्याचं पाहायला मिळालं.

Anti Hindi Protest : 'भाषा शास्त्राच्या दृष्टीने हिंदीसक्तीचा विषय चुकीच'; ठाकरेंच्या शिलेदाराच्या सरकारला इशारा

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी शिकवली जावी या निर्णयाला प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी भाषाशास्त्राचा दाखला देऊन विरोध केला आहे. मनोवैज्ञानिक दृष्ट्या, शिक्षण शास्त्रीय दृष्ट्या आणि भाषा शास्त्रीय दृष्ट्या हिंदी सक्ती निर्णय चुकीचा आहे. वयाच्या बारा वर्षापर्यंत मुलाला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. हा निर्णय राजकीय हेतूने आहे का? असाही सवाल बानगुडे पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच मराठीवर हिंदीच आक्रमण मराठीजण खपवून घेणार नाहीत, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Nitesh Rane News : 'मराठीची सक्ती आहेच.... उद्या “उर्दू” सक्ती...' नितेश राणेंची कडवट टीका

राज्यात हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या विरोधात दंड थोपाटले आहेत. 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून भाजप ठाकरे बंधुंवर जोरदार टीका करत आहे. आता मंत्री नितेश राणे यांनी देखील यावरून ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे. तसेच हिंदू समाजाला देखील आव्हान केलं आहे. समाज माध्यमावर याबाबत एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी, मराठीची सक्ती आहेच... पण आता हिंदी विरोधाच्या नावाने.. उद्या “उर्दू” सक्तीचीही मागणी करतील.. जागो हिंदू जागो! असे म्हटलं आहे.

Sunil Tatkare : ठाकरे बंधूंचा 'हिंदी'विरोधी मोर्चा..; सुनील तटकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठं 'फर्मान'!

Sunil Tatkare On Thackeray brothers' march : राज्य सरकारने केलेल्या हिंदी सक्तीविरोधात राज्यात नाराजी उमटली आहे. या निर्णयाविरोधात आता ठाकरे बंधू मोर्चा काढणार असून याचा फटका महायुतीला फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जातेय. याच दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताच नेता सहभागी होणार नसल्याचे जाहीर केलं आहे.

Ajit pawar News : "मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात हिंदीवरून मतभेद? अजितदादा म्हणतात... 'मी देखील...'

राज्यात हिंदी सक्तीवरून रान उठलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना टोला मारण्यात व्यस्त आहेत. अशा वेळी महायुतीचे सरकार सध्या एकटे पडण्याची स्थिती आहे. महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरकारची साथ सोडणारे वक्तव्य केलं आहे. त्यांनी माझं ही वैयक्तिक मत हे हिंदी पाचवी पासूनच लागू केली पाहिजे असे म्हटलं आहे.

Devendra Fadnavis News : 'ते मराठी तर मी काय पंजाबी...', फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला

राज्यात स्थानिकसह मुंबई महापालिका निवडणुकीचं रणमैदान जवळ आलं आहे. अशातच हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सरकारच्या विरोधात उतरले आहेत. आता 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे. एकीकडे महायुती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असतानाच फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावाल आहे. त्यांनी, ते मराठी असतील तर मी काय पंजाबी आहे का? असा सवाल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.