पीसीओएस, स्थूलता आणि वंध्यत्व हे तिघेही एकमेकांशी इतके जवळचे संबंध ठेवतात, की एकावर परिणाम झाला, की बाकी दोघांवरही होतो. हे एक प्रकारचे ‘हार्मोनल मेटाबोलिक त्रिकूट’ आहे, जे लाखो महिलांच्या प्रजनन, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करतं.
या लेखात आपण हे त्रिकूट का आणि कसं तयार होतं, त्यामागचं विज्ञान, परिणाम आणि योग्य उपाययोजना याचा सखोल आढावा घेणार आहोत.
1) स्थूलतेचा पीसीओएसवर प्रभाव
चरबी पेशींमधून अतिरिक्त अँड्रोजेन्स (पुरुष हार्मोन्स) तयार होतात, त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. ओव्ह्युलेशन होत नाही
अंडाणू तयार होत नाहीत
वंध्यत्व
2) पीसीओएसमुळे लठ्ठपणा वाढतो
इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते. चरबी शरीरात अधिक साठते. वजन वाढते, विशेषतः पोटाभोवती
3) दोघांमुळे वंध्यत्व होण्याची शक्यता दुपटीने वाढते
मेटाबोलिक दुष्टचक्र
स्थूलता
इन्सुलिन रेसिस्टन्स
पीसीओएस
हार्मोनल असंतुलन
ओव्ह्युलेशन बंद
वंध्यत्व
नैराश्य
भावनिक खाणं
अधिक स्थूलता
पीसीओएस व वंध्यत्व : वैज्ञानिक दृष्टिकोन
हार्मोनल इंबॅलन्स
अँड्रोजेन्स वाढ
अंडाणू न बनणे
LH:FSH असंतुलन
अंडाशयात सिस्ट्स तयार होतात प्रोजेस्टरॉन कमी
गर्भ टिकत नाही
Ovarian Dysfunction
अंडाशयात फॉलिकल्स तयार होतात पण ते फुटत नाहीत, त्यामुळे गर्भधारणा होत नाही
Endometrial Impact
गर्भाशयाचे अस्तर जास्त जाड होऊन गर्भासाठी योग्य राहत नाही
त्रिकूटाची ओळख करून देणारी लक्षणे
मासिक पाळी नित्यनेमाने येत नाही. ओव्ह्युलेशन होत नाही. चेहऱ्यावर आणि शरीरावर अति केस. मुरूम, केस गळणे. पोट वाढणे. गर्भधारणेत अडचण. नैराश्य, आत्मसंतोष कमी होणे.
नैतिक व सामाजिक प्रभाव
वंध्यत्वामुळे वैवाहिक तणाव. स्वतःच्या शरीराविषयी असमाधान. आत्मविश्वास गमावणे. मानसिक आरोग्य बिघडणे.
उपाय आणि व्यवस्थापन
तीनही बाबींसाठी एकाच वेळी उपाय शक्य आहेत.
वजन कमी करणे : पाच-दहा टक्के वजन घटल्यासच ओव्ह्युलेशन पुन्हा सुरू होतो. पीसीओएसची लक्षणं कमी होतात. गर्भधारणेची शक्यता वाढते
आहार सुधारणा : लो-ग्लायसेमिक आहार. साखर, प्रोसेस्ड फूड, ट्रान्स फॅट बंद. फायबरयुक्त, प्रथिनंयुक्त आहार
नियमित व्यायाम : दररोज ३०–४५ मिनिटं चालणे, योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग. शरीरातील इन्सुलिनचा प्रतिसाद सुधारतो.
तणाव नियंत्रण : ध्यान, योग, समुपदेशन. सपोर्ट ग्रुप्स
औषधोपचार :
हार्मोनल थेरपी, मेटफॉर्मिन. क्लॉमीफीन/ लेट्रोजोल (ओव्ह्युलेशन स्टिम्युलेशनसाठी) आवश्यक असल्यास आयव्हीएफ
रुग्ण अनुभव उदाहरण
‘मी पीसीओएसमुळे ४ वर्षे गर्भधारणा करू शकले नाही. वजन ८ किलो कमी केल्यावर माझी पाळी नियमित झाली. फक्त आहार आणि योगाने मी नैसर्गिकरीत्या गर्भवती झाले.’