शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज कोल्हापूरसह राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवरच कोल्हापूर पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना नोटीस लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्यामुळे त्यांना आंदोलन करता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर आज रास्ता रोको असल्याने आज सकाळी शिरोळ येथील निवासस्थानी पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेच्या पार्श्वभुमीवर त्यांना नोटीस दिली आहे.
Chitra Wagh vs Rohini Khadse : जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली..भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक्सवर एक कविता शेअर करत ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम, अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण? असं म्हणत त्यांनी ठाकरेंचं मराठी प्रेम बेगडी असल्याचं म्हटलं आहे. तर आता चित्रा वाघ यांच्या याच कवितेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कशासाठी आमदार व्हायचं असतं… काय करू लागली… जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली…ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली.. इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…’, अशा शब्दात त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमिवार आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून हे आंदोलन केलं जाणार आहे. कोल्हापुरातील आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी सहभागी होणार आहेत.
Krishnarao Bhegade Passes Away : मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधनPune News, 01 July : मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. सोमवार (ता. 30 जून) रोजी रात्री 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवारी सकाळी 11 वाजता लेख पॅराडाईज या राहत्या घरापासून निघणार आहे. तर अंत्यविधी बनेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार असल्याची माहिती भेगडे कुटुंबियांनी दिली आहे.