Shefali Jariwala News : अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. २७ जूनच्या रात्री ४२ वर्षीय शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला. सुरुवातीला तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या घरी तपास केला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पोलिसांच्या तपासात शेफालीच्या मृत्यूबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तिने फ्रीजमधील शिळे अन्न खाल्ले होते. त्यानंतर ती खाली पडली असा जबाब तिचा पती पराग त्यागीने पोलिसांकडे नोंदवला. शेफाली जरीवालाच्या घरी एंटी एजिंग गोळ्या आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या असलेले दोन बॉक्स सापडले होते. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय ती गोळ्या घेत होती. पण याचा तिला कोणताही त्रास झाला नव्हता, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
Pune : पुणे हादरलं! स्मशानभूमीत अघोरी प्रकार, अंत्यविधीच्या ठिकाणी हळद-कुंकू, टाचण्या, लिंबू, नारळ आढळल्याने खळबळशेफालीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली. कुटुंबियांपासून घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. शेफालीच्या पतीला, पराग त्यागीला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. 'ज्या दिवशी शैफालीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिचा पती परागची चौकशी करण्यात आली. त्यावेळी मी खूप घाबरुन गेले होते', असे वक्तव्य शेफालीची मैत्रीण पूजा घईने म्हटले.
Sangitatai Pawar : दगडाने ठेचून खून, त्याचवेळी मंदिरात चोरी; महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर'परागकडे शोक करायलाही वेळ नव्हता. तो सतत पोलिसांच्या रडारवर होता. ज्याक्षणी मी परागला पाहिले, तेव्हा या परिस्थितीतून त्याने लवकरात लवकर बाहेर यावे अशी मी आशा करत होते, सुदैवाने अहवालामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही हे स्पष्ट झाले आणि परागला सोडून देण्यात आले', असे वक्तव्य पूजा घईने केले.
Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, कोयत्याने सपासप वार केले अन्...