मुंबईतील मीरा रोडवर मनसेच्या कार्यकर्त्यांची फास्ट फूड कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
Webdunia Marathi July 02, 2025 04:45 AM

मराठी अमराठी भाषेचा वाद अजून देखील उसळत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठी न बोलल्यामुळे एका फास्टफूड कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. शिवाय त्याला चापट देखील मारण्यात आल्या आहे.

ALSO READ: आयएएस अधिकारी असल्याचा दावा करत 'भारत सरकार' ची नंबर प्लेट असलेल्या कारमधून फिरणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक

सदर घटना मीरारोड येथे एका हॉटेल मध्ये सोमवारी रात्री घडली आहे. जिथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्मचारीला मारहाण आणि शिवीगाळ गेली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याआधीही अशा अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. हिंदी बोलल्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. मराठीऐवजी हिंदी बोलल्याबद्दल मुंबईत असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत.

ALSO READ: लाऊडस्पीकर बंदीनंतर मुंबईत 'ऑनलाइन अजान' होणार

याआधीही मनसे कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर आली आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की मराठी भाषेचा आदर केला पाहिजे, परंतु जर कोणी तसे केले नाही तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

मीरा रोडवरील ही हाणामारी अशा वेळी झाली आहे जेव्हा ठाकरे बंधू ५ जुलै रोजी विजय रॅली काढणार आहेत. शिंदे आणि पवार गटातील अनेक नेते या रॅलीत सहभागी होऊ शकतात. दररोज घडणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ALSO READ: मुंबईत सायबर गुन्हेगारांनी महिला डॉक्टरला डिजिटल अटक करीत कोट्यवधी रुपये लुटले

गुंडगिरीच्या प्रकरणावर इतर पक्षांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे. भांडणे योग्य नाही. पण जर कोणी विनाकारण मराठी बोलण्यास नकार दिला तर ते देखील योग्य नाही.असे युबीटीने म्हटले आहे. याशिवाय राष्ट्रवादीनेही ते चुकीचे म्हटले आहे.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.