‘गर्व से सेंटर’ दिव्यांगांसाठी आशास्थान
नगराध्यक्ष कृपा घाग : पंचनदी येथे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १ ः दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने दापोली येथे ‘गर्व से सेंटर’चे उद्घाटन झाले. माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या व एनेबल इंडिया संस्थेच्या सहकार्याने स्थापन करण्यात आले. ‘गर्व से सेंटर’ केवळ एक इमारत नसून दिव्यांग समुदायाला स्वावलंबी बनवण्याचे एक महत्त्वाचे साधन ठरेल, असा विश्वास दापोलीच्या कृपा घाग यांनी व्यक्त केला.
प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश खूपच स्तुत्य असल्याचे मत त्याने मांडले. पंचनदी येथे झालेल्या कार्यक्रमाला नगरसेविका साधना बोथरे, कर्मचारी सौ. सांबरे उपस्थित होते. एनेबल इंडियाचे विकास गडदे यांनी एनेबल इंडियाबाबत व दिव्यागांसाठी चालणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वांजारे यांनी दिव्यांग समुदायासाठी हे एक अतिशय चांगले व्यासपीठ तयार झाले आहे. सर्वांनी याचा चांगला फायदा घेतला पाहिजे, असे सांगितले. दापोली अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण बोथरे यांनी माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्यांची टीम खूप चांगले काम करत आहे. मी स्वतः एक दिव्यांग आहे आणि मला माहिती आहे की दिव्यांग लोकांच्या किती समस्या असतात. आपण सर्वांनी मिळून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे सांगितले.