अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील रोहीलागड येथील वारकरी रामेश्र्वर लिंबाजी पाटील (वय-55) वर्षे यांचे सोमवारी (ता. 30) दुपारी दोन वाजता माऊलीच्या दिंडीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला पायी दिंडीत सहभागी झाले होते.
नातेपुते पाटील या वारकऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने यामध्ये रामेश्र्वर पाटील यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी थेट नातेपुते येथे जावून रामेश्र्वर पाटील यांचा मृतदेह आपल्या मूळगावी रोहीलागड येथे आणण्यात आला.
मंगळवारी (ता.1) सकाळी शोकाकूल वातावरणात गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे.
जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील शेतकरी रामेश्र्वर लिंबाजी पाटील हे वारकरी संप्रदायातील असून गत अनेक वर्षापासून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी दिंडीत नित्यनियमाने न चुकता आषाढी एकादशीला प्रत्येक वर्षी माऊलीच्या दिंडीत मोठया भक्ती भावाने सहभागी होत असत.