नाशिक- अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. ३०) विद्यार्थी, पालकांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती. कागदपत्रे व शुल्क भरत पहिल्या दिवशी दोन हजार ४८९ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रवेश निश्चित केले. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत मुदत आहे.
अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत गेल्या शनिवारी (ता. २८) पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर केली होती. तर यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीची प्रक्रिया राबविण्यासाठी सोमवार (ता. ३०)पासून मुदत दिली होती. दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला असल्याने विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते.
मात्र विविध तांत्रिक कारणांनी होत असलेल्या विलंबामुळे अतुरतेचे रूपांतर मनस्तापात झाले होते. पहिल्या फेरीची यादी जाहीर झाल्याने प्रवेश प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. कला, विज्ञान व वाणिज्य शाखा मिळून नाशिक जिल्ह्यात दोन हजार ४८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. सोमवार (ता. ७)पर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत असल्याने महाविद्यालय प्रांगणात पुढील आठवडाभर वर्दळ राहणार आहे.
३४ हजार विद्यार्थ्यांची निवड
पहिल्या फेरीसाठी नाशिक जिल्ह्यातून कला शाखेसाठी आठ हजार ७८५, वाणिज्य शाखेसाठी सहा हजार १२१, विज्ञान शाखेसाठी १९ हजार ५४३ असेशा एकूण ३४ हजार ४४९ विद्यार्थ्यांची निवड केली होती. यापैकी सुमारे पंचवीसशे विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून, अद्यापही मोठ्या प्रमाणात प्रवेश निश्चिती होणे बाकी आहे.
Agriculture News : इराण-इस्राईल युद्धाचा नाशिकच्या टोमॅटोला फायदा; दुबईतून वाढली मागणीसोमवारचे प्रवेश
शाखा उपलब्ध जागा झालेले प्रवेश
विज्ञान- ४४,९४० १,२०९
वाणिज्य- २२,८७५ ४१६
कला- ३८,४८५ ८६४