बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रामायण'मुळे (Ramayana) चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. 'रामायण'ची पहिली झलक गुरूवार (3 जुलै) ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रामायण' चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. चित्रपटाची पहिली झलक भारतात एकाच वेळी 9 शहरात दाखविण्यात येणार आहे.
9 शहरे कोणती?'रामायण' चित्रपटाचे पूर्ण नाव 'रामायण: द इंट्रोडक्शन' असे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोची या शहरांमध्ये 'रामायण'ची पहिली झलक दाखवण्यात येणार आहे. 'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. तर 2027मध्ये दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.
'रामायण' चित्रपट'रामायण' चित्रपटातरणबीर कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. तो श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साऊथची सुपरस्टार साईपल्लवीने सीता मातेची भूमिका साकारली आहे. तसेच रावणाची भूमिका चित्रपटात साऊथ अभिनेता यश, हनुमानाची भूमिका सनी देओल साकारत आहे.
Tharala Tar Mag : ठरलं तर मग! ३० दिवसांत 'विलास मर्डर केस'चा निकाल; अर्जुन-सायलीची पुढची खेळी काय? पाहा VIDEO'रामायण' चित्रपट भारताच्या पौराणिक महाकाव्यावर आधारित आहे. हा एक बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.'रामायण' चित्रपटात ॲक्शन, मायथोलॉजी आणि भव्यतेचा संगम पाहायला मिळणार आहे. चित्रपटात दमदार कलाकार, भन्नाट VFX, भव्य सेट्स पाहायला मिळणार आहेत. चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.
Jacqueline Fernandez Video : "दम दम..."; जॅकलिन फर्नांडिसचं नवीन गाणं रिलीज, तुम्ही पाहिलेत का?