Tharala Tar Mag : ठरलं तर मग! ३० दिवसांत 'विलास मर्डर केस'चा निकाल; अर्जुन-सायलीची पुढची खेळी काय? पाहा VIDEO
Saam TV July 02, 2025 02:45 PM

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेने सध्या रंजक वळण घेतले आहे. नुकताच मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामुळे मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विलास मर्डर केस आता लवकरच संपणार आहे. सायली-अर्जुनची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. नवीन प्रोमोनुसार विलास मर्डर केसचा निकाल फक्त 30 दिवसांत लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अर्जुन मधुभाऊ यांच्यासाठी विलास मर्डर केस लढताना मालिकेच्या सुरूवातीपासून आपण पाहत आहोत. आता या भागाचा शेवट काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रोमोमध्ये पाहून शकता की, विरोधी वकिल न्यायाधीशांना म्हणते की, "2 वर्षे विलास मर्डर केस सुरू आहे. वकिल अर्जुन सुभेदारकोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस या खटल्याच्या निकालाकडे डोळे लावून बसला आहे. आता आणखी उशीर नको." यावर न्यायाधीश म्हणतात की," फक्त 30 दिवसांत या केसचा निकाल लागेल.जुलै महिन्यात केसचा निकाल लागणार. "

अर्जुन-सायलीकडे आता फक्त 30 दिवस पुरावे गोळा करण्यासाठी आहे . त्यामुळे 'ठरलं तर मग' मालिकेत येणाऱ्या 30 दिवसात धक्कादायक ट्विस्ट आणि मोठ्या खुलासे पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 'ठरलं तर मग' मालिका संपणार असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. आता यावर अभिनेत्री जुई गडकरीने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

जुई गडकरीने मधुभाऊ यांच्यासोबत फोटो पोस्ट करून लिहिलं की, "मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ! ठरलं तर मग! विलास खुन खटल्याचे शेवटचे ३० दिवस! मालिका संपत नाहीये, पण केसचा निकाल मात्र नक्की लागतोय!" असे लिहून जुई गडकरीने 'ठरलं तर मग' मालिका संपत नसल्यावर शिक्कामोर्तब केला आहे. कोर्टरूम ड्रामा पाहण्यासाठी स्टार प्रवाहवर रात्री 8.30 ला आवर्जून 'ठरलं तर मग' ही मालिका पाहा.

'Sitaare Zameen Par'ची बॉक्स ऑफिसवर जादू फेल, ११ व्या दिवशी कमाईत घसरण
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.