Early symptoms of heart problems in males after 45: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. जर आपण हृदयाशी संबंधित आजारांबद्दल बोललो तर, महागाईप्रमाणे हृदयविकाराचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. देशभरात हृदयविकारांचा आजार वाढत आहे. भारतात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना तंदुरुस्त आणि निरोगी दिसत असूनही हृदयविकाराचा झटका येत आहे. यामागे कोणती कारणे असू शकतात हे जाणून घेऊया.
पहिले कारण कोणते?हृदयविकारामुळे पुरुषांच्या अकाली मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचे कारण म्हणजे दीर्घकालीन आजारांमध्ये वाढ होत आहे. आज अनेक पुरूषांना वयाच्या चाळीशीतच मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणाचा त्रास होत आहे. अनेकदा त्यांना हे देखील माहित नसते की हे आजार त्यांच्या शरीरात आहेत. हे आजार हृदयाच्या धमन्यांचा आतील थर शांतपणे खराब करतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा आणि नंतर कधीही हृदयविकाराचा धोका वाढतो.
दुसरे कारणआजकाल लोक व्यक्त होऊ शकत नाही. यामुळे ताण वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीच्या काळात संयुक्त कुटुंबे, लोकांमध्ये परस्पर संवाद आणि एकत्र बसून बोलणे हे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे मार्ग होते. एकत्र जेवणे, भावंडांसोबत विनोद करणे आणि मोकळेपणाने बोलणे यामुळे ताण कमी होत असे, परंतु आजचा माणूस अनेकदा भावनिकदृष्ट्या एकटे वाटतो. हळूहळू, एकटेपणा आणि मानसिक ताण हृदयावर ओझे बनतो आणि आरोग्य बिघडवतो.
Salt And Heart Disease: जास्त मीठ खाण्याची सवय हृदयविकाराचा धोका वाढवते, दीर्घायुष्यासाठी आजच बदला सवय सहनशक्तीचा अभावआपण भावनिक किंवा शारीरिक सहनशक्तीबद्दल बोललो तरी, आजच्या माणसामध्ये दोन्ही क्वचितच दिसून येतात. आजचा माणूस छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतो, लवकर थकतो आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर होतो. तसेच, वाहतूक, टीका किंवा कौटुंबिक वाद यासारख्या छोट्या छोट्या समस्या देखील आपल्यावर भावनिकदृष्ट्या परिणाम करतात. या सततच्या ताणामुळे शरीरात जळजळ होते ज्यामुळे धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी अस्थिर होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
बाहेरील फिटनेसची आवडअनेक पुरुषांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आपण वाचतो. याचे कारण म्हणजे पुरुष सिक्स-पॅकच्या मागे लागण्यासाठी, पावले मोजण्यासाठी, फ्लेक्स करण्यासाठी जिममध्ये जातात परंतु त्यांच्या शरीराची लवचिकता, सहनशक्ती, श्वास नियंत्रण आणि मानसिक शक्तीकडे दुर्लक्ष करतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी केवळ बाहेरून शक्ती आवश्यक नाही तर आतून मजबूत असणे देखील खूप महत्वाचे आहे. म्हणून तुम्ही कुठेही जा, तुमचे शरीर आतून तंदुरुस्त ठेवा.
कोणती काळजी घ्यावीनियमितपणे सकाळी व्यायाम करावा.
मेडिटेशन करावे.
अर्धा तास चालायला जावे.
मित्रपरिवार किंवा कुटुंबाशी संवाद साधावा.
पोष्टिक आहार आणि फळांचा आहारात समावेश करावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.