टीम इंडियाने (Team india) इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय फलंदाज या सामन्यात वेगळ्याच जोशात मैदानात उतरताना दिसले, विशेष म्हणजे कर्णधार शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा (Shubman gill &Ravindra Jadeja).
सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने (Team india) 211 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे सर्वांना वाटत होते की, पहिल्या सामन्यासारखीच भारतीय संघाची फलंदाजी लवकर कोलमडेल, पण या वेळी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) काहीतरी वेगळाच निर्धार करून खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
त्याने कर्णधार गिलसोबत सहावी विकेट पडण्याआधी विक्रमी 203 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 400 च्या पुढे नेली. जडेजाने या सामन्यात शानदार खेळी करत 137 चेंडूत 89 धावांची ऐतिहासिक खेळी केली, तर गिलने फलंदाजीची धुरा सांभाळत 269 धावा केल्या. दोघांच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत दिसत आहे.