Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे फक्त ४ नगरसेवक
Saam TV July 03, 2025 09:45 PM
Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीसाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख

- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा आषाढी एकादशीसाठीचा पोशाख साम टीव्हीवर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला खास पोशाख

- श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा पोशाख सर्वात आधी साम टीव्हीवर

- आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला भरजरी वस्त्रे

- जांभळ्या आणि भगव्या रंगाची भरजरी वस्त्रे

काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात सह्याद्री वन्यजीव संस्थेच्या बचाव पथकाला यश आलंय. तनिष्क मल्होत्रा असं या तरुणाचे नाव असून तीन दिवसांपूर्वी मित्रांसमवेत फिरायला आला असताना तो समुद्रात बुडाला. तटरक्षक दलाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही . आज सकाळी अँडव्हान्स थर्मल ड्रोनच्या मदतीने त्याचा मृतदेह सापडला.

Nashik: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे उरले बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक

- - ठाकरे गटाकडे उरले फक्त ४ नगरसेवक

- २०१७ साली शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते

- ३५ पैकी ३१ नगरसेवक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत

- तर फरार सुनील बागुल, मामा राजवाडे यांचा थेट भाजपमध्ये होणार पक्ष प्रवेश

कोंढवा पोलीस स्थानक हद्दीत 22 वर्षीय महिलेवर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून अत्याचार

कोंढवा पोलीस स्थानक हद्दीत 22 वर्षीय महिलेवर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून अत्याचार केलाय...

महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून महिलेला बेशुद्ध करण्यात आले ...

बेशुद्ध करून अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेचा मोबाईलमध्ये आरोपीने फोटो काढत मी पुन्हा येईल असं लिहिलं....

Nagpur: नागपूरसह संपुर्ण विदर्भात जून महिन्यात सरासरी पेक्षा अनेक जिल्ह्यात 12 टक्के पावसाची तूट

विदर्भातील फक्त बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली.. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात 33 टक्के प्लसमध्ये तर इतर जिल्ह्यात सरासरी न गाठू शकल्याने तूट पाहायला मिळाली.. संपूर्ण विदर्भात 11 टक्के दिसत असलेली तूट नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास यात 44 टक्के तूट राहिली तर त्याचा खालोखाल तूट ही पूर्व विदर्भातील अमरावती, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालीय...

बदलापूर वयोवृद्ध व्यक्तीची वाहत्या नाल्यात उडी मारून आत्महत्या

एका वृद्ध व्यक्तीनं वाहत्या नाल्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर शहरात घडलाय. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. बदलापूर पश्चिमेकडील अजय राजा हॉलच्या बाजूला वाहणाऱ्या नाल्यावरील पुलावर सकाळी 8च्या सुमारास एक वृद्ध व्यक्ती फिरताना पाहायला मिळाला. त्यानंतर अचानक त्या वृद्ध व्यक्तीनं वाहत्या नाल्यांमध्ये उडी मारली, यात त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनी या वृद्ध व्यक्तीचं शव आढळून आलं. या वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर आलेल्या डिप्रेशनमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.

भंडाऱ्यात भूमिगत गटार योजनेच्या कामात फसली स्कूल बस

भंडारा शहरात ठीक ठिकाणी भूमिगत पाईपलाईन आणि गटार योजनेसाठी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. मागील तीन दिवसात भंडाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि संपूर्ण भंडारा शहर चिखलमय झालं आहे. आज भंडारा शहरातील सिव्हील लाईन परिसरातील विद्यार्थ्यांना घेण्याकरिता गेलेली स्कूल बस या भूमिगत गटार योजनेच्या निकृष्ट कामामुळं चिखलात फसली. चालकानं अथक प्रयत्न केल्यानंतरही ही बस चिखलाच्या बाहेर नं निघता गटार योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात खोलवर फसली. त्यामुळं विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढत चिखल तुडवत दुसऱ्या पर्यायी वाहनाची व्यवस्था करून शाळेत पोहोचवावं लागलं. चिखलमय रस्त्यांमुळं विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्यानं सर्वत्र रोष बघायला मिळतोय.

पवना धरण परिसरात जोरदार पाऊस, 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरण परिसरात काल जोरदार पाऊस झाला त्यामुळे 24 तासात धरण क्षेत्रात 94 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज पर्यंत पवना धरण क्षेत्रात मध्ये 1022 पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी हा जखेर केवळ 315 मीटर पाऊस झाला होता. आणि धरणात 18.38 इतका साठा उपलब्ध होता. दरम्यान यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली आहे

रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नांची पालकमंत्री राणेंनी घेतली दखल

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सेवा देणाऱ्या आणि बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे समोर आले आहेत. अल्प मानधनावर काम करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकांनी वाढीव मानधन आणि अन्य प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी होण्यासमोर आंदोलन छेडले. मंत्री नितेश राणे यांनी या आंदोलनाची तत्काळ दखल घेतली. जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याशी संपर्क साधला. या प्रश्नाबाबत बैठक घेऊन तोडगा काढू आणि या चालकांचे प्रश्न सोडवू अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. त्यानंतर हे उपोषण आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.

संजय राऊतभारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे: नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले… क्लायमॅक्स असा की:: हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही! नाशिकमध्ये पुन्हा बांधकामाच्या खड्ड्यात कोसळून मुलाचा मृत्यू

बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून 9 वर्षीय मुलाचा मूत्यू झाल्याची धाकादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. दोन दिवसांत हि दुसरी घटना असून चार अल्पवयीन मुलांचा मूत्यू झाला आहे.

नाशिक अंबड लिंकरोडवरील सातपूर शिवारात असलेल्या भोर टाऊनशिपजवळ मोकळ्या मैदानात तीन ते चार शाळकरी मुले खेळत होती. जवळच एका गृहप्रकल्पासाठी खोदललेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावासाचे पाणी साचलेले असून, या खड्ड्यात नऊ वर्षीय मुलगा पाय घसरून बुधवारी दुपारी पडला.

सांगली... शिराळा तालुक्यात भात रोप लागणीला वेग

सांगलीच्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या रिमझिमित भात रोप लागणीला आता वेग आला आहे. पेरणी रखडलेल्या शेतात चिखलगुट्टा करून शेतकरी रोप लागणीची कामे करत आहेत . यावर्षी अति पावसामुळे पेरण्या धुळवाफ पेरण्या होऊ न शकल्यामुळे शेतकऱ्यांना आता रोप लागण करावी लागत आहे

बँक मॅनेजरने स्वतःवर चाकूने हल्ला करत रचला चोरी झाल्याचा बनाव

ऑनलाइन गेमिंगमध्ये तो कंगाल झाला.पैसे मिळवण्यासाठी चोरीचा प्लॅन आखला. जिथे काम करतो त्याच बँकेचे पैसे चोरट्यांनी हल्ला करून लंपास केल्याची कहानी रचली.त्यासाठी स्वतः वर चाकू हल्ला करून घेतला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिकमध्ये धक्का

* राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार गणेश गीते यांची आज भाजपात घरवापासी..

* गणेश गीते आज करणार भाजपात प्रवेश..

* माजी सभागृह नेते कमलेश बोडके देखील करणार भाजपात प्रवेश..

* उबाठाचे माजी नगरसेवक सीमा ताजने आणि प्रशांत दिवे देखील करणार प्रवेश

* सकाळी 10.30 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात होणार प्रवेश

* प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन राहणार उपस्थित..

* गणेश गीते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली होती विधानसभा निवडणूक..

* मात्र भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या समोर झाला होता पराभव...

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत.कोकण रेल्वे मधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत. रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (आरटीएम) आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (सीनियर आरटीएम) या पदांच्या जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांच्याकडे होत्या. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (उपाध्यक्ष सीसीएम) पदाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

त्यांना व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे.

सोलापूर बाजार समितीचे नवे नामकरण ; श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या नावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती सभापती दिलीप माने यांनी दिली.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या नावाचा आग्रह सभासद,शेतकरी,व्यापारी,हमाल- तोलार यांचा अनेक वर्षांपासून होता.१७ सप्टेंबर २०२२ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नव्या नावाचा ठराव एकमताने मंजूर झाला.नुकतीच २८ मे २०२५ रोजी या नावाला शासनाची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे यापुढील काळातही बाजार समिती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती या नवीन नावाने ओळखली जाईल.नवीन नावाला जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनीही मान्यता दिल्याची माहिती सभापती माने यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यात तीन महीन्यात बॅंका कडून खरिपाचे केवळ 37 टक्केच पिककर्ज वाटप

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणी अंतिम टप्प्यात आली असली तरी पीक कर्ज वाटपात बॅंकांना अद्याप ही गती आली नाही.30 जुन पर्यंत जिल्ह्यातील केवळ 65 हजार 187 शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.त्याची टक्केवारी 37 एवढीच आहे.पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बॅंकाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.बॅंकासमोर तीन महिन्यात 63 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाचे आव्हान आहे.जिल्हा प्रशासनाने 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी बॅंकाना 1658 कोटी 57 लाख रुपयांचे पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले माञ बॅंका कडुन 61 हजार 220 शेतकऱ्यांना 625 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांचे जीव घेणे स्टंट

पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे पर्यटकांचा बळी जाण्याच्या घटना रायगडमध्ये घडत असतानाच रायगड जिल्ह्यातील महाडच्या नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीव घेणे स्टंट केल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. महाडच्या बिरवाडी विभागातुन पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या अतीशय दुर्गम आशा डोंगर भागात हा धबधबा येतो. धबधब्याच्या लगत असलेल्या दोन डोंगरांवर दोर खंड बांधून गिर्यारोहकांच्या या गृपने खळाळत वाहणाऱ्या धबधब्याच्या पाण्यावर हे स्टंट केले आहेत. हा सर्व प्रकार साहसी असला तरी काळजाचा ठोका चुकवणारा असून या मुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून जीव घेणे स्टंट करणाऱ्या या गिर्यारोहक पर्यटकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

पंढरपूर - जिल्हाधिकार्यांचा पायी फिरून भाविकांशी संवाद

मागील वर्षीपासून आषाढी वारीला आलेल्या भाविकांना सुविधा देण्याचं काम सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सहभाग आहे. त्यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत पंढरपूर मध्ये आलेला वारकरी केंद्रबिंदू मानून सर्व उपक्रम हाती घेतले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पंढरपुरात पायी फिरून वारीच्या कामाचा आढावा घेतला असता दर्शन रांगेतून दर्शन घेतलेल्या भाविकांनी त्यांचं आभार मानले. अवघ्या सहा ते सात तासांमध्ये दर्शन होत आहे पंढरपूरमध्ये चांगली स्वच्छता आहे. प्रसन्न वातावरण आहे. अशा पद्धतीने प्रशासनाच्या कामाचं कौतुक भाविक करत आहेत.

विद्युत दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली पंढरी

यंदाच्या वारीला प्रति कुंभमेळ्याचे स्वरूप देण्यात आले आहे. वारीकर्याच्या स्वागतासाठी पंढरपूर शहरात प्रमुख मार्गावर विद्युत दिव्यांची आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या प्रकाशाने पंढरी नगरी न्हाऊन निघाली आहे.

रविवारी आषाढी एकादशी सोहळा आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत. विश्राम गृहावर देखील रोषणाई करण्यात आली आहे. प्रबोधनकार ठाकरे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली. याशिवाय शहरातील प्रमुख रस्त्यांवरच्या खांबावर दिव्यांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.

अंबरनाथमध्ये कुटुंब वारीला गेले असताना घरफोडी

पाले गावात राहणारे दिगंबर म्हात्रे हे कुटुंबासह वारीला गेले असताना, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत रात्री तीन वाजताच्या सुमाला एक चोरटा म्हात्रे यांच्या घराचे कुलूप तोडून आत शिरला, त्यानंतर त्याने घरातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरली , आणि आरमार दार उघडून बाहेर येऊन त्याने आरामात कपडे बदलुन तिथून पोबारा केला, ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मात्र या प्रकरणी अजूनही अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा आरोप म्हात्रे कुटुंबाने केला आहे .

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढण्याच्या दावा अशास्त्रीय: अंनिस

वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला प्रयोगशील शेतकरी पुरस्कार स्वीकारताना सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी केलेला मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढवण्याचा दावा हा संपूर्णपणे अशास्त्रीय आहे. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्रातील हरित क्रांतीसाठी मोठे काम केलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपली भूमिका तातडीने जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिस कडून करण्यात आली आहे.

चोरट्यांना अहिल्यानगर परिसरातून अटक

सिंहगड रस्त्यावरील सराफी पेढीत पिस्तुलाच्या धाकाने दरोडा घालून पसार झालेल्या चोरट्यांना अहिल्यानगर परिसरातून अटक करण्यात आली. चोरट्यांबरोबर असलेल्या एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

वरद संजय खरटमल (वय २०, रा. कुदळेचाळ, वडगाव बुद्रुक), अमर हनुमंत बाभळे (वय २०, रा. धबाडी, वडगाव बुद्रुक), ओंकार रवी शिंदे (वय २२, रा. नऱ्हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सराफी पेढीच्या मालक मंगल घाडगे (वय ५५, रा. सदाशिव दांगट नगर, आंबेगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune : वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याचं मंगळसूत्र बाईकस्वारांनी लांबवलं

कान्हूर मेसाई येथे वाजण्याच्या सुमारास गावातील माथेरान हॉटेल शेजारी असणाऱ्या टपरी वरील ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात बाईकस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

वृद्ध महिला छोटासा टपरी चालवण्याचा व्यवसाय करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यानी सिगारेट विचारण्याच्या बहाण्याने थांबून अचानक तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळ काढला. हा प्रकार क्षणार्धात घडला असून चोरटे पूर्ण चेहरा मास्कने झाकून होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.