MNS-UBT Shiv Sena Rally Mumbai : फक्त राज उद्धवच नाही, तर हे चार ठाकरेही एकत्र दिसणार, अमित आणि आदित्यसह… आणखी कोण असेल मेळाव्यात?
GH News July 05, 2025 02:06 PM

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्य सक्तीचा निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतल्यानंतर राज्यात जल्लोषाचे वातावरण आहे. हा मराठी भाषेचा , मराठी अस्मितेचा विजय असल्याचे सांगत शिवेसना ठाकरे गट आणि मनसेतर्फे आज वरळी डोम येथे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने राज व उद्धव हे दोन्ही बंधू तब्बल 20 वर्षांनी राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसणार असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून, पादधिकारी, नेत्यांकडून या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ‘आवाज मराठीचा! असा भावनिक संदेश लिहीत वाजत गाज या , गुलाल उधळत मराठीसाठी या असे आवाहन राज्यातील तमाम मराठीजनांना करण्यात आलं आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही गटांते हजारो कार्यकर्ते राज्यभरातून या मेळाव्यासाठी मुंबईत आले असून कला, चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारही या विजयी मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधूंचे जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहेत.राज आणि उद्धव या दोन्ही बंधूंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्रातं लक्ष लागलं असून त्या दोघांना इतक्या वर्षांनी एकत्र पाहण्यासाठी राज्यातील जनता खूप उत्सुक आहे.

चार ठाकरेही दिसणार एकत्र

पण विशेष बाब म्हणजे या मेळाव्यामुळे फक्त राज आणि उद्धव हे दोघेच नव्हे तर आणखी चार ठाकरेसुद्ध एकत्र दिसणार आहेत. राज आणि उद्धव ठाकरे हे या मेळाव्यात व्यासपीठावर दिसतील त्यांचं भाषणही होईल. मात्र त्यासोबत ठाकतरे परिवारातील आणखी चार प्रमुख सदस्यदेखील या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मि ठाकरे, शर्मिला ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा लेक अमित ठाकरे हे देखील या मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसतील. दोन्ही ठाकरे बंधूंच हे कुटुंब आज स्टेसमोरच्या पहिल्या रांगेत बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या मेळाव्यासाठी येणाऱ्या दोन्ही पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी देखील आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मात्र हजारो कार्यकर्त्ये उपस्थित राहणार असून सर्च लोक आतमध्ये मावणं कठीण आहे, त्यामुळे वरळी डोमच्या बाहेर देखील एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.