आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेले पाहायला मिळालं. आज हे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत विजयी मेळावा पार पडला. वरळी डोममध्ये हा कार्यक्रम पार पडला. सुप्रिया सुळेंपासून ते जिंतेंद्र आव्हाडांपर्यंत सर्वजण मेळाव्याला उपस्थित होते. राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक पक्षांनी आणि संघटनांनी घेतली होती.त्यावरच आधारित हा मेळावा पार पडला.
उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी एकनाथ शिंदेंवर टीका केली आणि नंतर फडणवीसांवरही निशाणा साधला.
महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेले पाहायला मिळालं. तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. दरम्यान भाषणा दरम्यान उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच आलोय अशी मोठी घोषणा केली. मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा संयुक्त असा विजयी मेळावा आज वरळी डोममध्ये पार पडला. हजारो कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम राज ठाकरेंची आणि नंतर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी एकनाथ शिंदेंवर टीका केली आणि नंतर फडणवीसांवरही निशाणा साधला.
सुप्रिया सुळेंनी आदित्य ठाकरेंचा हात धरला अन्….
एकाच मंचावर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं चित्र सर्वांसाठी फार खास होतं. पण कार्यक्रमानंतरचा एक प्रसंग हा नक्कीच सर्वांसाठी खास होता.तो म्हणजे दोन्ही भावांप्रमाणे काका पुतण्यांचं एकत्र येणं. कार्यक्रमाची सांगता करताना सुप्रिया सुळे जेव्हा मंचावर आल्या तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेचा हात धरून त्या थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे घेऊन आल्या. त्यांनी आधी आदित्य ठाकरेंचा हात धरून त्यांना राज ठाकरेंच्या जवळ उभं केलं. नंतर अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या बाजूला जाऊन उभं राहण्यास सांगितलं. हा प्रसंग घडताच तुफान टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनी हा प्रसंगदेखील तेवढाच भावला.