युद्ध पुन्हा सुरु होणार! इराण ‘या’ दिवशी इस्रायलवर हल्ला करणार?
GH News July 05, 2025 07:07 PM

युद्धबंदीनंतरही इराणवर बॉम्बहल्ले सुरु आहेत. मात्र इराणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे बोलले जात आहे. कारण मोहरमच्या 10 तारखेनंतर म्हणजेच 6 किंवा 7 जुलैला इराण इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. कारण 6 जुलैला इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे इस्रायलवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेतन्याहू यांना अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्याची परवानगी मिळाली तर इराणचे सर्वोच्च नेते खामेनींची चिंता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्रायलने हल्ला करण्यापूर्वीच इराण हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हा हल्ला भीषण असण्याची शक्यता आहे, कारण इराणने याआधीच स्रष्ट केले आहे की, यापुढे युद्ध झाले तर ते करा किंवा मरा असे होईल.

खामेनी चिंतेत

नेतान्याहू 6 जुलै रोजी अमेरिकेला जाणार आहेत त्यामुळे खामेनी यांची चिंता वाढली आहे. आपल्या अमेरिका दौऱ्यात नेतान्याहू इराणवर हल्ला करण्याची परवानगी मागू शकतात. ही परवानगी मिळण्याआधीच इराण हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. 6 जुलै रोजी इराणमध्ये युम-ए-आशुरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी इराणमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, हे कार्यक्रम संपताच खामेनी इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश देऊ शकतात.

इराण शक्तिशाली हल्ला करणार

समोर आलेल्या माहितीनुसार, इराण इस्रायलवर 3 टप्प्यात हल्ला करण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्यातील हल्ल्यात मोठे नुकसान होऊ शकते. पहिल्या टप्प्यात इराणसह हिजबुल्लाह आणि हुथी देखील इस्रायलवर हल्ला करू शकतात. या टप्प्यात इराण तेल अवीव आणि मध्य इस्रायलवर ड्रोनने हल्ले करु शकतो. त्यानंतर दुसऱ्या टप्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली जातील. तिसऱ्या टप्प्यात इस्रायलवर सायबर हल्ला होऊ शकतो. हे सायबर हल्ले पॉवर ग्रिड, कम्युनिकेशन सिस्टम, बँकिंग सिस्टम, लष्करी तळ आणि लष्करी मुख्यालयावर केले जाण्याची शक्यता आहे.

इस्रायल प्रत्युत्तर देणार 

इराणचा अणुकार्यक्रम अजूनही सुरू असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणची क्षेपणास्त्रे युरोप आणि अमेरिकेसाठीही धोकादायक आहेत. त्यामुळे इस्रायल इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो. या युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.