Cricket : 1 मालिका, 3 सामने आणि 16 खेळाडू, टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, माजी कर्णधाराला डच्चू, या खेळाडूकडे नेतृत्व
GH News July 05, 2025 08:06 PM

बांगलादेश क्रिकेट टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकेने बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता श्रीलंकेने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 5 जुलै रोजी आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे आयोजित करण्यात आला आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 8 जुलै रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर यजमान विरुद्ध पाहुणे यांच्यात 10 ते 16 जुलै दरम्यान 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या टी 20i मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 3 सामन्यांसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. लिटॉन दास याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी कर्णधार नजमुल हसन शांतो याला वगळण्यात आलं आहे.

नईम शेखचं कमबॅक

श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतून सलामी फलंदाज नईम शेख यांचं कमबॅक झालं आहे. नईमने गेल्या काही काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच जोरावर त्याला पुनरागनमनाची संधी मिळाली. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सैफुद्दीन याचंही कमबॅक झालं आहे. तर वेगवान गोलंदाज नाहिद राणा, हसन महमूद आणि खालिद अहमद या तिघांना डच्चू देण्यात आला आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 10 जुलै, पल्लेकेले

दुसरा सामना, 13 जुलै, रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला

तिसरा आणि अंतिम सामना, 16 जुलै, आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो.

श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी बांग्लादेश संघ : लिटॉन कुमार दास (कर्णधार), तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, मोहम्मद नईम शेख, तॉहीद हृदोय, झाकेर अली, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, महेदी हसन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब आणि मोहम्मद सैफुद्दीन.

बांगलादेशसाठी करो या मरो सामना

दरम्यान बांगलादेश 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. बांगलादेश दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेला मालिका जिंकण्यापासून रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.