रामबन/जम्मू : अमरनाथ यात्रेकरूंच्या पाच बस एकमेकाला धडकून झालेल्या अपघातात ३६ यात्रेकरू जखमी झाले आहेत. रामबन जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली. जम्मूच्या भगवती नगर येथून पहलगामकडे निघालेल्या या बसना अपघात झाला.
हा अपघात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर चंदेरकूट येथे सकाळी आठच्या दरम्यान झाला. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातानंतर अमरनाथ यात्रा पूर्ववत झाली.
रामबनचे जिल्हाधिकारी महंमद खान म्हणाले, ‘‘पहलगामकडे जाणाऱ्या वाहनांपैकी शेवटच्या वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे चंदेरकोट लंगर साइटवर उभी असलेली वाहने आदळली. त्यामुळे चार वाहनांचे नुकसान झाले आणि ३६ यात्रेकरू जखमी झाले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी जखमी यात्रेकरूंना रामबन येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली आणि प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखभाल करण्याचे निर्देश दिले.
उर्वरित यात्रेकरूंना अन्य वाहनांतून पुढे पाठवण्यात आले.’’ अचानक झालेल्या या अपघातामुळे अमरनाथ यात्रेकरूंमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण होते. यात्रेकरूंसाठी मोफत भोजनाची व्यवस्था केलेल्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे या मार्गावरील काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
Jagannath Rath Yatra:'जय जगन्नाथ' च्या गजरात भक्तांनी ओढले रथ; बहुदा यात्रेने रथयात्रेची सांगता ६९०० यात्रेकरू रवानाजम्मू ः भगवतीनगर बेस कॅम्प येथून पावसात ६९०० हून अधिक यात्रेकरूंचा जत्था दर्शनासाठी शनिवारी रवाना झाला. यात्रेकरूंमध्ये ५,१९६ पुरुष, १,४२७ महिला, २४ मुले, ३३१ साधू-साध्वी आणि एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. पहाटे ३.३० ते ४.०५ या कालावधीत यात्रेकरू दर्शनासाठी निघाले. दरम्यान, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ गुहेतील शिवलिंगाचे पहिल्या दोन दिवसांत २०,०००हून अधिक जणांनी दर्शन घेतले आहे.