महिलांनी वर्कआउटच्यावेळी कोणते कपडे घालावेत? जाणून घ्या
Tv9 Marathi July 06, 2025 07:45 PM

आजकाल महिलांमध्ये फिट आणि तंदुरुस्त राहण्याची जाणीव वाढली आहे. त्यामुळे जिममध्ये जाणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या प्रक्रियेत फॅशन आणि स्टाईलही महत्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक मुली जिममध्ये स्टाइलिश दिसण्यासाठी टाइट फिटिंग लेगिंग्ज, टॉप्स आणि स्पोर्ट्स ब्रा घालतात. पण, हे फॅशनचे कपडे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असं फिटनेस एक्सपर्ट ज्योती यांचं म्हणणं आहे.

टाइट कपड्यांमुळे होणारे आरोग्याचे धोके:

1. त्वचेचे इन्फेक्शन: जिममध्ये व्यायाम करताना खूप घाम येतो. टाइट कपडे घातल्यास तो घाम त्वचेवरच राहतो आणि त्यामुळे बॅक्टेरिया व फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. विशेषतः अंडरआर्म्स, कंबर आणि मांडी या भागात अधिक त्रास होतो.

2. ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा: टाइट कपडे शरीराच्या नसा दाबतात, ज्यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो. दीर्घकाळ अशा कपड्यांचा वापर केल्यास पाय सुन्न होणे, खवखव होणे किंवा थकवा जाणवणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

3. घाम सुकण्यात अडथळा: टाइट कपड्यांमुळे हवा आत जाऊ शकत नाही आणि घाम त्वचेवरच राहतो. त्यामुळे शरीर थंड होत नाही आणि ओव्हरहिटिंग मुळे चक्कर येणे किंवा थकवा जाणवतो.

4. त्वचेवर रॅशेस आणि ॲलर्जी: काही सिंथेटिक आणि टाइट कपड्यांमुळे त्वचेला रॅशेस येतात किंवा अॅलर्जी होते. काही वेळेस हे पिगमेंटेशनचं कारणही बनतं.

फिटनेस एक्सपर्टची योग्य कपड्यांची शिफारस:

फिटनेस एक्सपर्ट ज्योती यांचं सांगणं आहे की, व्यायाम करताना त्वचेला श्वास घेता येईल असे आणि आरामदायक कपडे वापरावेत. ते थोडे लूज फिटिंग असावेत आणि त्वचेसाठी सुरक्षित असावेत.

योग्य कपड्यांचा पर्याय:

1. कॉटन आणि ड्राय-फिट फॅब्रिकचे कपडे निवडावेत.

2. थोडे सैल कपडे वापरावेत जे हालचालीस अडथळा आणणार नाहीत.

3. हवा पास होणारे आणि घाम शोषणारे फॅब्रिक निवडावेत.

4. वर्कआउटनंतर कपडे त्वरित बदलावेत.

एकंदरीत, टाइट कपडे जरी स्टाइलिश वाटत असले, तरी त्यांच्या वापरामुळे शरीरावर आणि त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, फॅशनच्या नावाखाली आरोग्याशी तडजोड करणे टाळावे. योग्य कपड्यांची निवड ही फिटनेसच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.