Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी
Saam TV July 06, 2025 10:45 PM

योगेश काशीद 
बीड
: बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा १८ महिन्यापूर्वी धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात अद्याप एकही आरोपीला अटक झाली नाही. परंतु आता बाळा विजयसिंह बांगर यांचा जबाब काल केज येथे पोलिसांनी नोंदवला असून साधारण ६ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. यामुळे सदर प्रकरणात त्या दिशेने तपास देखील सुरू केला आहे.

बीडच्या परळीतहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. तरी देखील यातील आरोपी अद्याप अटकेत नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मात्र हत्येती आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

दोन दिवसांपूर्वी विजयसिंह बाळा बांगर यांनी पाटोदा येथे पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. यात महादेव मुंडे यांची हत्या वाल्मीक कराड आणि त्याच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनी केल्याचा दावा विजयसिंह बाळा बांगरने केला आहे. तर वाल्मीक कराडला भेटण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्यांना मारला. त्यांनी व्यापारी महादेव मुंडे यांचा एक मासाचा तुकडा आणल्याचा धक्कादायक खुलासा पाच दिवसांपूर्वी केला आहे.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

सहा तास कसून चौकशी 

त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवावा; अशी मागणी केली. तसेच या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनी देखील तातडीने सूत्रे हलवत तब्बल सहा तास चौकशी करत बाळा बांगर यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.