विरार (बातमीदार) : नायगाव पूर्वेमधील शांती गोविंद हायस्कूलमध्ये आज (ता. ६) आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सहावीतील विद्यार्थी रुद्र मांडवकर याने विठ्ठल हा विटेवर का उभा आहे, याची गोष्ट सांगितली. माउलींच्या गाण्यावरती एक सुंदर नृत्यदेखील सादर करण्यात आले. या वेळी नाटक सादर करण्यात आले. शाळेत छोट्या वारकऱ्यांची म्हणजेच विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.
Ass ociated Media Ids : MUM25E96818