अन्न: हे पदार्थ खाल्ल्यात पडतात?
Marathi July 07, 2025 08:25 PM

असं म्हणतात की, स्वप्नांचा आपल्या रोजच्या दिनचर्येशी संबंध असतो. कारण आपण जे काही खातो, पितो, दिवसभर जी कामे करतो त्याचा आपल्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आपल्याला पडणारी स्वप्ने कधी चांगला अनुभव देणारी तर कधी झोप उडवणारी असतात. काही स्वप्ने तर इतकी भयानक असतात की, रात्रभर आपल्याला झोपही लागत नाही, आपल्याला सतत घाम येतो आणि आपली घाबरगुंडी उडते. पण, आता आम्ही तुम्हाला असे म्हटले की, पडणारी वाईट स्वप्ने काही खाद्यपदार्थामुळे पडतात तर.. कोणाचा विश्वास बसणार नाही. पण, नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, काही पदार्थ वाईट स्वप्न पडण्याला कारणीभूत असतात असे सांगण्यात आले आहे. नक्की प्रकरण काय आहे समजून घेऊयात या लेखातून

हे संशोधन 1 जूलै 2025 रोजी फ्रंटियर्स इन सायकोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरील संशोधन जवळपास 1 हजार विद्यार्थ्यांवर करण्यात आले आहे. त्यानुसार असे आढळून आले की, ज्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे, अशांना याचा धोका असतो. जसे की, रात्रीच्या वेळी दूध, दही, चीज असे पदार्थ खाल्ल्याने रात्री भयानक स्वप्ने पडतात. यामागचे कारण असे सांगितले जाते की, हे डेअरी प्रॉडक्ट्स खाल्ल्याने पोट फुगीची समस्या उद्भवते. या पोटाच्या तक्रारीमुळे झोप लागत नाही, स्वप्नांमध्ये भीती निर्माण होते आणि तुम्ही दचकून जागे होता.

यूनिवर्सिटी ऑफ मॉन्ट्रियलच्या प्रोफेसरांच्या सांगण्यानुसार, जर तुमच्या पोटात गडबड असेल तर त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. कारण जेव्हा पोटात गॅस, अपचन, सूज असते तेव्हा शांत झोप लागत नाही. या संबधांवरूनच अन्न आणि स्वप्नांमध्ये खोल संबंध सांगितला जातो. कारण आपण खात असलेले पदार्थ शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही प्रभाव टाकतात.

अभ्यासानुसार, कोणत्या पदार्थांनी झोप बिघडते हे सांगण्यात आले आहे. त्यानुसार पुढील पदार्थ झोपेचे चक्र खराब करतात.

  • दूध, दही किंवा चीज
  • गोड
  • मसालेदार
  • नॉन -वेजेरियन सामग्री

शांत झोपेसाठी काय खावे हे पाहूयात,

अक्रोड –

शांत झोप लागण्यासाठी अक्रोड खाणे अधिक प्रभावी मानले जाते.

केळी –

केळ्यामध्ये मॅग्नेशियम, ट्रिप्टोफॅन, व्हिटॅमिन बी -6, पोटॅशियम आदी घटक असतात. हे सर्व घटक शांत आणि गाढ झोपेसाठी आवश्यक आहेत.

भोपळ्याच्या बिया –

तुम्हाला निद्रानाशेची समस्या असेल तर तुम्ही भोपळ्याच्या बिया खायला हव्यात. या बियांमधील घटक शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर असतात.

बदाम –

बदाम चांगली झोप लागण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुम्ही बदाम अवश्य खायला हवेत.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=x4vwyock2n0

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.