-rat७p२९.jpg-
२५N७६०२६
राजापूर ः मोहरम आणि आषाढी एकादशीच्या मिरवणुकीत सहभागी झालेले पोलिस अधीक्षक नितीन बगाटे.
-----
राजापुरात आषाढी एकादशी उत्साहात
पोलिस अधीक्षकांचा सहभाग ; मोहरमही शांततेत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ ः शहरासह तालुक्यामध्ये हिंदू बांधवांच्यावतीने आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच मुस्लिम बांधवांच्यावतीने मोहरम धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. एकाच दिवशी या दोन्ही आलेल्या सण वा उत्सवामध्ये सहभागी होत जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि पोलिस प्रशासनाने सामाजिक सलोखा जोपासला.
हिंदू समाजबांधवांची आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा मोहरम एकाच दिवशी आले. त्यामुळे हे दोन्ही सण वा उत्सव कायदा आणि सुव्यवस्था राखत शांततेत साजरा व्हावेत या संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजबांधवांसोबत बैठक घेऊन चर्चाही केली होती. त्या निमित्ताने शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. हिंदू बांधवांच्यावतीने काढण्यात आलेली वारकरी दिंडी आणि मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक बगाटे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी माईनकर, पोलिस निरीक्षक अमित यादव आदी सहभागी झाले होते. दोन्ही समाजांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत जिल्हा पोलिस अधीक्षक बगाटे आणि सहकारी पोलिसांनी जोपासलेल्या सामाजिक सलोख्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
---