शुभमन गिलप्रमाणे ८ मुलांक असलेले लोकांचे कसे असते व्यक्तिमत्व?
esakal July 09, 2025 02:45 PM
Shubman Gill शुभमन गिल

भारताचा कर्णधार शुभमन गिल याचा जन्म तारीख ८ सप्टेंबर १९९९ आहे. त्यामुळे त्याचा मुलांक ८ आहे.

Shubman Gill ८ मुलांक

दरम्यान, ८ मुलांक असलेल्या वक्ती म्हणजेच ज्यांची जन्म दिनांक ८, १७, २६ आहे, अशा व्यक्ती अंकशास्त्रानुसार साधारण कशा असतात, याबाबत जाणून घेऊ.

Shubman Gill कारक ग्रह

८ क्रमांकाचा कारक ग्रह शनी असल्याने जीवनात संघर्ष, संयम आणि कर्म महत्त्वाचे ठरते. शनी हा शुक्र, बुध, राहू आणि केतू यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो, तर सूर्य व मंगळ याच्याशी त्याचे वैर आहे.

Shubman Gill शिस्तप्रिय, महत्त्वाकांक्षी आणि मेहनती

मूलांक ८ असणाऱ्या व्यक्ती शिस्तप्रिय, महत्त्वाकांक्षी आणि कठोर मेहनत करणाऱ्या असतात.

Number 8 Numerology धार्मिक प्रवृत्ती

मूलांक ८ च्या व्यक्ती हे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात. तसेच आध्यात्मिकतेकडे वळण्याचे परिवर्तन अनुभवांवर आधारित हळुहळू होते.

Number 8 Numerology जीवन चढ-उतारांनी भरलेलं

या व्यक्तींना अनेकदा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. मेहनतीनंतरही अपेक्षित यश मिळत नाही. त्यांचं जीवन चढ-उतारांनी भरलेलं असतं. पण यातूनच त्यांना अनुभव मिळतो.

Number 8 Numerology कर्म

शनी म्हणजे कर्म, आणि त्यामुळेच ते स्वतःशी प्रामाणिक राहतात.

Number 8 Numerology आळस

हे लोक आळशी असण्याची देखील शक्यता असते, तसेच कामाची गती धीमी असते, जे त्यांच्या यशाच्या प्रवासात अडथळा ठरू शकते.

Number 8 Numerology करियर

व्यक्ती तांत्रिक क्षेत्र, अभियांत्रिकी, पेट्रोकेमिकल्स, स्टील उद्योग, व्यापार, उत्पादन आणि निर्यात-आयात यामध्ये चांगले यश मिळवू शकतात.

Number 8 Numerology हे टाळा

या व्यक्तींनी जुगार किंवा कोणत्याही सट्टाबाजीत गुंतवणूक करू नये.

Number 8 Numerology डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Shubman Gill 430 धावा! शुभमन गिलचा कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.