<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास येथील कँटिनमध्ये मारहाण केल्याचा प्रकार काल रात्री (मंगळवारी, ता-8) समोर आला. निकृष्ट जेवण दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर त्यांनी मारहाण आणि एकंदरीत घडलेल्या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे. दिलेलं जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण होतं, त्यानंतरच माझी तेथील कर्मचाऱ्यांवर झालेली ती माझी प्रतिक्रिया होती, असं आमदार गायकवाड यांनी म्हटलं आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आकाशवाणीच्या कँटिनमध्ये मी जेवतो आहे. काल(मंगळवारी) रात्री 10 वाजता मी कँटिनमधून रोजच्याप्रमाणे दोन चपाती, डाळ, राइस अशी ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर एक घास खाल्ला आणि जेवण खराब वाटलं. दुसरा घास खाल्ल्यानंतर माझी उलटी झाली. उलटी झाल्यानंतर मी जसा होतो तसाच कँटिनमध्ये गेलो आणि कँटिनमधील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली, हे जेवण कोणी दिलं, त्या लोकांना बोलवा असं सांगितलं. तिथे बसलेल्या मॅनेजरलाही देखील दिलेली डाळ दाखवली. कँटिनमध्ये जेवणाऱ्या इतरांनाही डाळ दाखवली. सगळ्यांनी हे जेवळ निकृष्ट नाही, तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर माझी तेथील कर्मचाऱ्यांनी देखील ते जेवण खराब असल्याचं बोलले त्यानंतर आलेली ती माझी प्रतिक्रिया होती असंही पुढे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात पण मला वाटतं सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जेवतात. सगळ्या जाती-धर्माचे लोक तिथे जेवतात. हा तीस वर्षापासूनचा कंत्राटदार त्या ठिकाणचा आहे. त्यांचे किचन अतिशय घाण आहे, त्यांच्या किचनमध्ये उंदीर फिरतात त्यांनी आम्हाला जेवण चक्क सडलेलं दिलं होतं. त्यांनी आम्हाला निकृष्ट दर्जाचा नाही तर सडलेलं अन्न दिलं होतं. मी त्याला जेवणाची ऑर्डर दिली होती. दोन चपाती भात डाळ जेवण आणल्यानंतर एक घास खाल्ल्यानंतर मला ते सडलेलं जाणवलं. दुसऱ्या घासाला मला उलटी झाली. ते जेवण घेऊन मी कॅन्टीनमध्ये गेलो. तेथील कामगारांना मी अन्नाचा वास दिला तो म्हणाले घाण वास आहे. मी एकाला नाही तर इथल्या दहा लोकांना ते दाखवलं. त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं. जेवण तू चांगलं देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून सांगितले. तरी त्याला समजत नसेल तर मी त्याला माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं आणि मला त्याचा काहीही पश्चाताप झालेला नाहीये. विरोधी पक्ष माझ्या बाबतीत काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही. याप्रकरणी सोशल मीडिया लोक प्रतिक्रिया देत आहेत, सगळेजण त्या जेवनाबद्दलचा आपला आपला अनुभव शेअर करत आहेत. आमदार देखील सांगत आहेत. अधिकारी सांगत आहेत. अनेक लोकांचे मला फोन येत आहेत, असंही पुढे संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, आम्ही तिथल्या एमडी यांना सांगतो या जेवणाची तपासणी करा. हे लोक जेवणाची तपासणी का करत नाहीत. आता मी नरहरी शिरवळ यांना भेटून आलो, त्यांनी सांगितले आम्ही मागे दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं. पण अद्याप रिपोर्ट आलेला नाही यांचे जर दोन-दोन, चार -चार महिने रिपोर्ट येत नसतील तर हे लोकांना जहर खाऊ घालणार आहेत. या सदनांमध्ये असलेले सर्व आमदार, मंत्री हे प्रत्येकजण आपल्या कार्यकर्त्यांसोबत इथे जेवतात. मी जो विषय उचललेला आहे. माझ्या एकट्याची ही लढाई नाही. सगळ्यांची असायला पाहिजे होती. पत्रकार देखील येथे जेवतात. तुम्हाला देखील तसा अनुभव असेल. हे मी वेगळे सांगायची गरज नाही. माननीय अध्यक्ष महोदयांनी मला संधी दिली तर मी हे सगळं सत्य मी मांडले. कायदा सुव्यवस्था बिघडायला तिथे काही जातीय दंगल नाही आणि ज्या लोकांना मराठी मध्ये सांगून समजत नाही. त्यांना आम्ही कुठल्या भाषेत सांगणार. जे विरोधक मला बोलत आहेत, तेच 2014-15 च्या दरम्यान ज्यावेळी राजन विचारे खासदार होते, दिल्लीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना अशाच प्रकारचे जेवण दिले गेले होते, त्यांनी त्या जेवणात दिलेली पोळी त्या वेटरच्या तोंडात कोंबली होती आणि त्याला मारलं होतं. मी तर असं काही केलं नाही. मी तर आधी त्यांना खात्री करायला सांगितली बघा हे कसा आहे. ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं हे जेवण खराब आहे त्यावेळी माझी ही प्रतिक्रिया होती आणि ती स्वाभाविक आहे असे पुढे संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
& nbsp;