स्वीडीश लक्झरी कार कंपनी व्होल्वो लवकरच भारतात आपली सर्वात छोटी आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक SUV EX30 लाँच करणार आहे. ही सुव्ह व्होल्वोच्या EX40 पेक्षाही स्वस्त असणार आहे. आणि हिचा लुक देखील जवळपास EX90 सारखाच असणार आहे. खास बाब म्हणजे या SUV EX30 ला भारतातच असेम्बल केले जाऊ शकते, या कारची किंमत कमी ठेवली जाऊ शकते. परंतू कंपनीने अद्याप हिच्या किंमतीबाबत अधिकृत सांगितलेले नाही.
EX30 एक कॉम्पॅक्ट परंतू लक्झरी फिल देणारी सुव्ह आहे. या कारमध्ये तुम्हाला थॉरच्या हॅमर स्टाईलची हेडलाईट्स मिळणार आहे. तसेच यात क्रॉसओव्हरसारखी प्रोफाईल पाहायला मिळणार आहे.
ही सुव्ह खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना इलेक्ट्रीक व्हेईकल मध्ये नवीन काही हवे परंतू एका प्रीमियम ब्रँडची जे वाट पाहात आहेत.
व्होल्वो केवळ लुकमध्येच शानदार नसून तिच्या तांत्रिक फिचर्स देखील खूपच दमदार आहेत.
भारतात व्होल्वो EX30 चे दोन व्हर्जन लाँच होऊ शकतात. ज्यात 69kWh चा बॅटरी पॅक दिला जाणार आहे.
यात सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर असे दोन विकल्प मिळू शकतात, जे ४२७ बीएचपी पॉवर देतील.
कंपनीचा दावा आहे की ही कार ० ते १०० किलोमीटरचा प्रति तासाचा वेग केवळ ३.४ सेंकदात पकडू शकते.
याची अंदाजीत ड्रायव्हींग रेंज सुमारे ५०० किलोमीटरपर्यंत असू शकते. ज्यामुळे सध्या ईलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये ही कार एक पॉवरफुल पर्याय बनू शकते.
EX30 सुव्ह कारचे इंटेरिअर खूपच प्रीमीयम आहे. ज्यात एक पारंपारिक तरीही मॉडर्न डिझाईन पाहायला मिळेल.
कारमध्ये १२.३ इंचाचा पोर्ट्रेट- ओरिएंटेड टचस्क्रीन दिलेला आहे. जो गुगल -बेस्ड इन्फोटेन्मेंट सिस्टीमसह असणार आहे.
याशिवाय यात हरमन कार्डनचा प्रीमियम साऊंड सिस्टीम, पॅनॉरमिक ग्लास रुफ, पावर्ड सीट्स, ३६० डिग्री कॅमेरा आणि ADAS सारख्या एडवांस्ड सेफ्टी फिचर्स सामील आहेत.
या सर्व वैशिष्ट्यांमुळे EX30 एक फुल्ली लोडेड लक्झरी इलेक्ट्रीक सुव्ह बनणार आहे.