ENG vs IND : बर्मिंगहॅममध्ये आणखी एक सामना, टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध जिंकणार?
GH News July 12, 2025 02:04 AM

मेन्स टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 6 जुलै रोजी इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 300 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने मात केली. टीम इंडियासाठी हा विजय अविस्मरणीय असा ठरला. टीम इंडियाचा बर्मिंगहॅममधील हा पहिलावहिला कसोटी विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर आता टीम इंडियाचा बर्मिंगहॅममध्ये आणखी एक सामना आयोजित करण्यात आला आहे. मात्र हा सामना पुरुष नाही तर महिला संघाचा आहे. या सामन्याला कधी आणि किती वाजता सुरुवात होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

वूमन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. भारताने या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. भारताने या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकले. त्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकत आव्हान कायम राखलं आणि टीम इंडियाला मालिका जिंकण्यापासून रोखलं. मात्र टीम इंडियाने चौथ्या सामन्यात कमाल केली. टीम इंडियाने चौथा सामना जिंकला आणि इतिहास घडवला. भारताने चौथ्या सामन्यासह मालिका जिंकली. टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडी मजबूत केली.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा टी 20i सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा टी 20i सामना शनिवारी 12 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा टी 20i सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा टी 20i सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचव्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचव्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजून 35 मिनिटांनी टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवायला मिळेल.

पाचव्या सामन्यात कोण जिंकणार?

दरम्यान आता टीम इंडियाकडे पाचवा सामना जिंकून विजयाचा चौकार लगावण्याची संधी आहे. तर यजमान इंग्लंडचा अंतिम सामना जिंकून मालिका विजयाचा गोड शेवट करण्याचा प्रयत्न असणार आहे. हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टॅमी ब्यूमोंट इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या पाचव्या सामन्यात कोणता कर्णधार आपल्या टीमला विजयी करण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांना लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.