जगभरात प्रसिद्ध असलेली इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्ला (Tesla) आता भारतात पाऊल ठेवत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार टेस्ला १५ जुलै रोजी मुंबईत आपले शोरुम सुरु करणार आहे. हे शोरुम एक खास एक्सपिरियन्स सेंटर असणार आहे. येथे लोक टेस्लाच्या कारना निरखून पाहू शकणार आहेत आणि विशेष म्हणजे टेस्लाची टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकणार आहेत. हे पाऊल भारतात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रीक कारच्या मार्केटकडे पाहून घेण्यात आले आहे. इलेक्ट्रीक कारच्या मार्केटमध्ये त्यामुळे मोठी स्पर्धा वाढणार आहे.
टेस्लाचे पहिलं वहिलं शोरुम भारताची आर्थिक राजधानी मुंबईत उघडणार आहे. या शोरुम साठी कंपनीने एक जागा भाड्यावर घेतली आहे. ही केवळ कारना प्रदर्शित करणारी जागा नसेल तर या कारसाठी एक प्रिमियम एक्सपिरियन्स सेंटर म्हणून तयार करण्यात आले आहे.जेथे ग्राहकांना टेस्लाचे तंत्रज्ञान समजता येणार आहे.
या शोरुममध्ये ग्राहक टेस्लाच्या कारना समोरुन पाहू आणि समजू शकणार आहेत इंटरएक्टीव्ह डिस्प्ले आणि तांत्रिक माहीती घेऊ शकणार आहेत. आणि विशेष म्हणजे कारची टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकणार आहेत. टेस्लाची चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचा डेमो देखील पाहू शकणार आहेत.
टेस्लाचे सीईओ इलॉन मक्स याच्या नेतृत्वाखाली कंपनी खूप काळापासून भारतात येण्याची तयारी करीत आहे. या वर्षी मार्चमध्ये टेस्लाने मुंबई शोरुमसाठी जागा निश्चित केली होती. आणि त्यानंतर या कंपनीने भारतात नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरु केली होती. टेस्ला आता दिल्ली आणि अन्य मोठ्या शहरात देखील जागेचा शोध केला जात आहे. म्हणजे भारतात आपले नेटवर्क वेगाने पसरवू शकणार आहे.
टेस्लाच्या भारतातील प्रवेशाने इलेक्ट्रीक कारच्या बाजारातील स्पर्धा वेगाने सुरु होणार आहे. आतापर्यंत टाटा, महिंद्रा, MG आणि BYD सारख्या कंपन्यांनी इलेक्ट्रीक कार बाजारात उतरवल्या आहेत. त्यात आता टेस्ला सारखा ग्लोबल ब्रँड भारतीय बाजारात उतरत असल्याने टेक्नॉलॉजी,स्टाईल आणि परफॉर्मन्सचे नवा स्तर पाहायला मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रीक कार केवल स्वस्तात मिळणार नसून प्रीमियम आणि स्मार्ट पर्याय मिळणार आहे. टेस्लाच्या प्रवेशाने भारतीय इलेक्ट्रीक कारचे मार्केट पहिल्यापेक्षा अधिक वेगाने वाढणार आहे.