ड्रग्ज प्रकरणाची मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली दखल; पोलिसांवर कारवाईची मागणी
Marathi July 12, 2025 08:25 PM

मीरा रोड: मिरा रोड (Mira raoad)  येथील ड्रग्ज प्रकरणाची गंभीर दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik takes) यांनी घेतली आहे. एबीपी माझा ने  या प्रकरणावर आज  प्रकाश टाकल्यानंतर, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः हाटकेश परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच दोषींवर कारवाई करणार असल्याते सरनाईक म्हाले.

दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी

या दरम्यान, त्यांनी ड्रग्ज विक्रीत सहभागी असलेल्या व्यक्तींचा पर्दाफाश करणाऱ्या युवकाची भेट घेतली होती. त्याचे कौतुक केले. तसेच काशिगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच मिरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. माझ्या मतदारसंघात ड्रग्ज विक्री कदापी सहन केली जाणार नाही. असे ठामपणे सांगत सरनाईक यांनी ड्रग्ज रॅकेटमध्ये स्थानिक पोलीस यंत्रणेचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. “पोलिसांचा सहभाग नसता, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची विक्री कशी काय शक्य झाली असती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला

या प्रकरणामुळे मिरा भाईंदरमधील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण

सरनाईक यांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी थेट संपर्क साधला असून, दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ते करणार आहेत. तसेच हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे मिरा भाईंदरमधील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, आता राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिरा भाईंदरमधील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण

सरनाईक यांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी थेट संपर्क साधला असून, दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ते करणार आहेत. तसेच हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे मिरा भाईंदरमधील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, आता राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिरा भाईंदरमधील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, आता राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Mumbai-Pune Expressway Missing Link project: महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; खोपोलीला Start-कुसगावला End, कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?, आज फडणवीस-शिंदेंकडून पाहणी

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.