इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. इंग्लंडने टीम इंडियाला 193 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 62.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 58 रन्स केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला पाचव्या आणि अंतिम दिवशी लॉर्ड्समध्ये विजयासाठी आणखी 135 धावांची गरज आहे. तर इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या विजयापासून 6 विकेट्स दूर आहे. त्यामुळे आता पाचव्या दिवशी कोण मैदान मारणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.