पुणे: संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना घडली. घटनेनंतर आता माझी हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला होता. या घटनेनंतर प्रविण गायकवाडांनी थेट शरद पवारांची भेट घेतली आहे. वंगणफेक हल्ल्यानंतर प्रविंण गायकवाडांनी शरद पवारांना भेटून सगळं सांगितलं. या विषयात अनेकांवर निशाणे साधले जाऊ शकतात, दीपक काटे बावनकुळेंना गॉडफादर मानतात तसेच या प्रकरणात आता गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी अपेक्षा असल्याचंही शरद पवारांना सांगितल्याचंही ते म्हणाले. चर्चेत आणखी काय काय झालं?
रविवारी जी घटना घडली ती घडल्यापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मला सातत्याने फोन करत आहेत माहिती घेत आहेत. शरद पवार साहेबांनी अनेक कॉल केले होते सध्याची परिस्थिती योग्य नाही काळजी घे असं सांगितलं होतं.दोन ते तीन वेळा साहेबांनी फोन केला होता.आज पुण्यात साहेबांची भेट घेऊन घडलेल्या सगळ्या प्रकार सांगितल माझा जो संशय की मला मारण्याचा कट होता आहे तो देखील सांगितला. असं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले.
प चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक काटे त्यांच्यासोबत असायचे .दीपक काटे बावनकुळे यांना गॉडफादर मानतात.गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी माझी अपेक्षा असल्याचे साहेबांना सांगितलं आहे.सध्याची परिस्थिती जी आहे अनेकांवर असे निशाणे साधले जाऊ शकतात अशी माहिती मी पवार साहेबांना दिल्याचं प्रविण गायकवाडांनी सांगितलं.
संपूर्ण परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे , संपूर्ण प्रकरणाची माहिती मी घेत आहे माझ्या पद्धतीने सरकारला माहिती कळवतो असं साहेबांनी सांगितलं.पोलिसांनी सहकार्य केलं नाही म्हणून मी आता पोलिस संरक्षण घेणार नाही असे मी साहेबांना सांगितलं आहे .अनेक मंत्री पोलिसांवर दबाव ठेवून आहेत.दोन दिवसात दीपक काटे यांना सोडून द्या, असं अनेक मंत्र्यांनी पोलिसांना सांगितला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin gaikwad) यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवधर्म संघटनेचे आणि भाजप (भाजप) पदाधिकारी इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा
आणखी वाचा