भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुबमन गिल याची कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला गूड न्यूज मिळाली आहे. नितीश कुमार रेड्डी याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीशला एपीएल अर्थात आंध्रप्रदेश प्रीमियर लीग स्पर्धेतील एका संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नितीश कुमार रेड्डी एपीएल स्पर्धेच्या चौथ्या हंगामात भीमावरम बुल्स संघाचं नेतृत्व करणार आहे. एपीएल स्पर्धेची सुरुवात 2022 साली झाली होती. ही स्पर्धा राउंड रॉबिन फॉर्मेटनुसार खेळवण्यात येते. या स्पर्धेत एकूण 19 सामने होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 7 संघ सहभागी होणार आहेत.
नितीश आंध्रप्रदेश क्रिकेट वर्तुळातील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक आहे. नितीश आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमसाठी खेळतो. नितीशला एसआरएच फ्रँचायजीने 6 कोटी रुपयात रिटेन केल होतं. तसेच नितीश कसोटीसह टी 20i फॉर्मटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो. नितीशने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
नितीशने भारताचं 7 कसोटी आणि 4 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. नितिशने 7 सामन्यांमधील 13 डावांत 1 शतकासह एकूण 343 धावा केल्या आहेत. तसेच 8 विकेट्स मिळवल्या आहेत. तर नितीशने 4 टी 20i मध्ये 90 धावा करण्यासह 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दरम्यान आंध्र प्रीमियर लीग 2025 या हंगामात एकूण 7 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये अमरावती लायन्स, भीमावरम बुल्स, काकीनाडा किंग्स, रॉयल्स ऑफ रायलसीमा, सिमहाद्री वायजॅक लायन्स, तुंगभद्रा वॉरियर्स आणि विजयवाडा सनशायनर्स या संघाचा समावेश आहे.
नितीशची कर्णधारपदी नियुक्ती
नितीश व्यतिरिक्त या स्पर्धेत हनुमा विहारी, केएस भरत, शेख रशीद, रिकी भुई आणि अश्विन हेब्बार हे खेळाडू नेतृत्वाची जबाबदारी पार पाडणार आहेत.