आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि बदलत्या हवामानात आरोग्यासोबत केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्यात पावसाळा सुरू झालेला आहे. या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे लोकांमध्ये केस गळतीची समस्या वाढत असते. पण कधीकधी केस जास्त वेळा धुण्यामुळे केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. काही लोकं काही दिवसांच्या गॅपने केस धुतात, तर काहीजण हे दररोज केस धुतात. अशा वेळेस लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की आठवड्यातून नेमकी किती वेळा केस धुणे कसे सुरक्षित आहे? किंवा जर तुम्ही बरेच दिवस केस धुतले नाहीत तर स्कॅल्पवर त्याचा काय परिणाम होते?
खरंतर, केस धुण्याची योग्य पद्धत केवळ तुमच्या केसांच्या पोतावरच अवलंबून नाही तर तुमच्या स्कॅल्पच्या आरोग्यावर, तेलाच्या उत्पादनावर आणि जीवनशैलीवर देखील अवलंबून असते. तर या लेखात जाणून घेऊया की स्कॅल्पचे आरोग्य लक्षात घेऊन केस धुण्याची योग्य पद्धत कोणती असावी, वारंवार केस धुतल्याने काय होते?
तुमची स्कॅल्प खूप तेलकट असेल तर तुम्हाला तुमचे केस वारंवार धुवावे लागू शकतात, तसेच तुमचे केस कोरडे किंवा कुरळे असतील तर वारंवार धुण्यामुळे त्यातील नैसर्गिक तेल निघून जाण्याची शक्यता असते. तर केसांच्या योग्य वाढीसाठी आणि स्कॅल्पचे आरोग्यासाठी हवामान, व्यायामाचे प्रमाण, धूळ आणि प्रदूषण यासारखे अनेक घटक देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हेच कारण आहे की तज्ञ सर्वांसाठी समान नियम लागू करत नाहीत, परंतु टाळूच्या गरजेनुसार केस धुण्याची दिनचर्या सेट करण्याची शिफारस करतात.
हेल्थलाइनच्या मते, दररोज केस धुतल्याने तुमच्या स्कॅल्पवर आणि केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होऊ शकतात. तर दुसरीकडे तुम्ही तुमचे केस खूप बऱ्याच दिवसांच्या गॅपने धुतले तर यामुळे समस्या उद्भवू शकतात. जसे की केस कमी धुण्यामुळे कोंड्यापासून केसांमध्ये खाज येण्यापर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, जर तुम्ही तुमचे केस बराच काळ धुतले नाहीत तर त्यामुळे टाळूमध्ये दुर्गंधी येऊ शकते.
आठवड्यातून किती वेळा आपण आपले केस धुवावेत हे आपल्या केसांच्या आरोग्यावर अवलंबून असते. पण जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर आठवड्यातून एकदा केस धुणे चांगले. यामुळे तुमचे केस कमी कोरडे होतील आणि त्यात ओलावा राहील. विशेषतः ज्यांच्या केसांवर केमिकल ट्रीटमेंट झाली आहे किंवा जे वयस्कर आहेत, त्यांचे केस सहसा कोरडे होतात. त्यामुळे त्यांनी आठवडाभर केस धुतले नाहीत तर ते त्यांच्या केसांमधील ओलावा टिकवून ठेवू शकतात आणि कोरडेपणा टाळू शकतात.
सध्या केस न धुता किती दिवस राहू शकतात यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. कारण प्रत्येकाचे केसांचे आरोग्य आणि जीवनशैली वेगळी असते. काही लोकं एक दिवसाच्या गॅपने केस धुतात तर काही आठवड्यातून दोनदा केस धुतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांच्या आरोग्यानुसार आणि प्रकारानुसार तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)