79941
‘एसएसपीएम’मध्ये २६ जणांचे रक्तदान
कणकवली, ता. २६ ः ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या म्हणीला अनुसरून हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि एसएसपीएम लाईफटाइम हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले.
प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी श्रीफळ वाढवून या शिबिराचा प्रारंभ केला. शिबिरात २६ जणांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी लाईफटाइम हॉस्पिटलच्या रक्तपेढीचे प्रमुख मनीष यादव, डॉ. गणेश जयभाये, तंत्रज्ञ अक्षता केळकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या वनिता जंगले, परिचारिका गौरी पवार यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वितेसाठी डॉ. रावसाहेब ठोंबरे, प्रा. सचिन वंजारी, डॉ. नितीन शिवशरण, प्रा. अजित गोसावी, प्रा. प्राजक्ता राणे, प्रा. ओंकार साळवी, प्रा. अरविंद कुडतरकर, डॉ. शुभांगी माने, वैभव यादव, विद्यार्थी प्रतिनिधी भार्गवी कवतकर, जिगिशा म्हापसेकर, तुकाराम नाईक, साईश कोचरेकर यांनी सहकार्य केले.