Kolhapur Crime : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून पळून जाताना कैद्याने वापरलेली मोटार सापडली
esakal July 27, 2025 10:45 PM

Kolhapur Kalamba Central Jail : कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून पसार झालेल्या सुरेश चोथे याच्या ताब्यातील मोटार वैभववाडी बाजारपेठेतील एका हॉटेलसमोर आढळून आली. ही मोटार शुक्रवार (ता. २५) पासून तेथे असून याबाबत वैभववाडी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे पथक वैभववाडीकडे येण्यास निघाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील शिक्षकाच्या आंबोली (ता. सावंतवाडी) येथील खूनप्रकरणी सुरेश चोथे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तो सध्या कळंबा कारागृहात होता. कारागृहाजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करताना तो मोटार (एम एच-०९ जीए २१६१) घेऊन पसार झाला होता. कोल्हापूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Kolhapur Politics : पक्ष कार्यालय उद्घाटनावेळी 'हर्षल' व्यक्तिमत्वाला पाहून कागलमधील नेत्याच्या पुत्राला संताप अनावर; अन्यथा अंगावर धावून...

दरम्यान, वैभववाडीशहरातील दत्तमंदिर परिसरातील एका हॉटेलसमोर गुरुवारी दुपारपासून एक मोटार उभी होती. त्याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर ती ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आली. नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेत असताना ही मोटार घेऊन चोथे घेऊन पसार झाल्याचे स्पष्ट झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.