प्रसिद्ध उद्योजक राहुल हजारे यांना राज्यस्तरीय “समाज रत्न” पुरस्कार
esakal July 27, 2025 11:45 PM

प्रसिद्ध उद्योजक राहुल हजारे यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार
पनवेल, ता. २७ (बातमीदार) : नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व डीडीएसआर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल हजारे यांना ‘यशस्वी उद्योजक व समाजरत्न’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शनिवारी (ता. २६) पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यप्रेरणेतून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. राहुल हजारे यांनी नवी मुंबई व परिसरात बांधकाम व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. विशेषतः अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे, सामाजिक प्रकल्प राबवणे, शिक्षण व आरोग्यसेवा पुरवणे, तसेच उपेक्षित घटकांसाठी कार्य करणे यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राहुल हजारे म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे माझ्या सामाजिक बांधिलकीची पावती आहे. समाजासाठी अधिक काही करण्याची प्रेरणा मला या गौरवामुळे मिळाली आहे. कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक राजकीय नेते, उद्योजक, समाजसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनीही सांगितले की, अशा समाजधुरीणांचा सन्मान करणे हीच अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याची खरी आठवण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.