शेअर बाजारात घसरण, FIIs ची विक्री: सेन्सेक्स 81,299 आणि निफ्टी 24,782 वर उघडले; एफआयआयने 7,000 कोटींची विक्री केली, तर डीआयआय सलग 15 दिवस खरेदी करत आहेत.
कमोडिटी मार्केटमध्ये हालचाल: सोनं आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले, पण देशांतर्गत बाजारात 900 रुपयांनी घसरले; चांदी आणि कच्च्या तेलातही घसरण.
कॉर्पोरेट आणि आयपीओ अपडेट्स: कोटक महिंद्रा बँकेचा कमकुवत निकाल, टीसीएसकडून 12,000 कर्मचाऱ्यांची कपात; शांती गोल्ड आयपीओ पूर्ण सबस्क्राइब, ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्सला कमी प्रतिसाद.
Stock Market Opening Today: आज (25 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स 164 अंकांनी घसरून 81,299 वर उघडला, तर निफ्टी 55 अंकांनी घसरून 24,782 वर उघडला. बँक निफ्टीत 313 अंकांची घसरण झाली असून तो 56,215 वर उघडला.
आजच्या व्यापारात रिअल्टी सेक्टर सर्वाधिक दबावाखाली दिसत असून 2 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातही विक्रीचा जोर आहे. मात्र, FMCG आणि फार्मा क्षेत्रात खरेदी होत असल्याने या सेक्टर्समध्ये काही प्रमाणात स्थिरता दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनसोबत 15 टक्के टॅरिफ असलेला व्यापार करार जाहीर केला आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यातही आजपासून टॅरिफसंदर्भातील चर्चा पुन्हा सुरू होणार आहे.
अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लटकनिक यांनी स्पष्ट केले आहे की, टॅरिफवरील डेडलाइन 1 ऑगस्टनंतर वाढवली जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची सूटही मिळणार नाही. यावरून स्पष्ट होतं की, अमेरिका चीनवर दबाव ठेवण्याच्या भूमिकेत आहे. याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत असून, त्याचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसत आहे.
गिफ्ट निफ्टी 24,850च्या आसपास स्थिर दिसत आहे. मात्र, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून तब्बल 7,000 कोटी रुपयांची मोठी विक्री केली. याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी(DIIs) सलग 15व्या दिवशी खरेदी सुरू ठेवली आहे.
कमोडिटी मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात हालचाल झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती 50 डॉलर्सने वाढून 3,390 डॉलर्सवर पोहोचल्या. तर, देशांतर्गत बाजारात सोनं 900 रुपयांनी घसरून 97,800 रुपयांवर बंद झालं. चांदीतही मोठी घसरण झाली. 2,000 रुपयांनी घसरून 1,13,000 रुपयांवर बंद झाली. कच्च्या तेलाच्या किमती 1% घसरून 68 डॉलर्सच्या खाली आल्या आहेत.
Premium |Property Sale : घर विकताय? भांडवली लाभ कराबद्दल जाणून घ्या! कमकुवत निकाल आणि टीसीएसची कर्मचारी कपातजून तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचा निकाल निराशाजनक राहिला. बँक ऑफ बडोदा आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचे निकाल मिळते-जुळते आले. एसबीआय कार्डचे निकाल अपेक्षेनुसार, तर पुनावाला फिनकॉर्पने चांगली कामगिरी केली.
आज इंडसइंड बँक आणि बीईएलचे निकाल जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर, माझगाव डॉक, गेल, अदानी ग्रीन, अदानी गॅस, टोरेंट फार्मा आणि पिरामल फार्मा यांसारख्या एफअँडओ स्टॉक्सवर लक्ष आहे.
दरम्यान, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसने मोठी कर्मचारी कपात जाहीर केली आहे. कंपनी 12,000हून अधिक मिड आणि सीनियर लेव्हल कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे, जे कंपनीच्या एकूण कर्मचार्यांच्या जवळपास 2% आहे.
आयपीओ बाजारात हलचालशांती गोल्डच्या आयपीओलापहिल्याच दिवशी पूर्ण सबस्क्रिप्शन मिळाले असून, त्याचा प्राइस बँड 189-199 रुपये आहे. याउलट, ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्सचा आयपीओ फारसा आकर्षक ठरत नसून आतापर्यंत केवळ सव्वा पटीनेच भरला आहे.
FAQs
शेअर बाजार का घसरला?
(Why did the stock market fall?)
- कमकुवत जागतिक संकेत, एफआयआय विक्री आणि रिअल्टी-बँकिंग क्षेत्रातील दबावामुळे घसरण झाली.
सोनं आणि चांदीच्या किमतीत एवढी हालचाल का?
(Why are gold and silver prices so volatile?)
- आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा डॉलर-तेलावर वाढता दबाव यामुळे हालचाल.
टीसीएसकडून इतकी मोठी कर्मचारी कपात का?
(Why is TCS laying off so many employees?)
- कंपनीच्या खर्च कपातीच्या धोरणामुळे आणि मिड-सिनियर लेव्हल पदांची पुनर्रचना करण्यासाठी.