ratchl२८५.jpg-
80604
चिपळूण ः ढोक्रवली येथे यंत्राद्वारे भातलावणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
------------
यंत्राद्वारे भातलावणीचे
ढोक्रवलीत प्रात्यक्षिक
चिपळूण, ता. २९ ः तालुक्यातील ढोक्रवली येथे दिनेश कदम यांच्या प्रक्षेत्रावर कोकण कृषी विद्यापिठाने निर्माण केलेले मनुष्यचलित भातलावणी यंत्राद्वारे भातलावणीचे प्रात्यक्षिक झाले. कमीत कमी मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त शेती भातपिकाखाली कशी येईल, या अनुषंगाने हे यंत्र तयार केले आहे. प्रशिक्षणावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, सहाय्यक कृषी अधिकारी विजय साळुंखे, कृषी सेवक राजश्री निंबाळकर उपस्थित होते.