टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.त्यामुळे इंग्लंडला हा सामना बरोबरीत सोडवून किंवा विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे.तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी हा सामना म्हणजे करो या मरो असा आहे. इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या या सामन्यातील कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचव्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध इंडिया पाचवा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.