झी मराठीवर तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची नवीन मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
पुर्णिमा डे अधिरा राजवाडे या GenZ फॅशन डिझायनरची व्यक्तिरेखा साकारते.
सेटवर धमाल मस्ती आणि सहकलाकारांशी जुळलेली मैत्री पुर्णिमासाठी खास ठरली.
झी मराठीवर लवकरच वीण दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या मालिकेत पुर्णिमा डे हिचा वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे. या मालिकेत तिने सुबोध भावेच्या बहिणीचा अभिनय केलाय.
अधिरा आणि तिच्या भावातील प्रेम, तिचं हट्टी स्वभाव, एक वेगळीच ऊर्जा घेऊन येणारी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी नक्कीच आवडेल. पुर्णिमाने या नव्या मालिकेबद्दल म्हणाली की, 'अधिरा राजवाडेला फॅशन डिजायनार बनायचं असतं. तिचे बाबा नसल्यामुळे ती दादा मध्ये बाबाही पाहते. अधिरा एक GenZ मुलगी आहे आणि तिचा दादा तिचे सर्व हट्ट पूर्ण करतो.
दरम्यान शुटिंगवेळीचा अनुभव सांगताना पुर्णिमा डे म्हणाली की, 'सर्व टीम एकत्र असल्यामुळे गप्पा गोष्टी, स्वादिष्ट खाणं आणि धमाल मस्ती करत आम्ही तो प्रोमो शूट पूर्ण केलं. सेटवर माझी मैत्री खरतर सुबोध दादा, चंदू सर , विनायक सर आणि मंदार यांच्यांशी चांगली झाली'
View this post on InstagramA post shared by Dr. Purniemaa ♡ (@purniemaadey_official)
दरम्यान 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका ११ ऑगस्ट पासून दररोज ७:३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
FAQs
‘वीण दोघातली ही तुटेना’ ही मालिका केव्हा सुरू होणार आहे?
११ ऑगस्टपासून रोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठीवर.
या मालिकेत पुर्णिमा डे कोणती भूमिका साकारत आहे?
ती अधिरा राजवाडेची म्हणजेच सुबोध भावेच्या बहिणीची भूमिका करते.
अधिरा राजवाडेची व्यक्तिरेखा कशी आहे?
GenZ विचारांची, हट्टी स्वभावाची आणि फॅशन डिझायनर बनण्याचं स्वप्न असलेली मुलगी.
या मालिकेत इतर कोणते कलाकार आहेत?
तेजश्री प्रधान, सुबोध भावे, चंदू सर, विनायक सर, मंदार यांचा समावेश आहे.
सुपरस्टार असूनही तुटलं नातं, मीना कुमारीची दुःखद प्रेम कहाणी, दारुचं इतकं व्यसन झालं की, गमवावा लागला जीव