इच्छेविरुद्ध पतीने घेतला घटस्फोट मग कॅन्सरपुढे तीही हरली; मृत्यूनंतर नवऱ्याने केले तिच्याच घरच्यांवर आरोप
esakal August 03, 2025 03:45 AM

८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक नायिका होत्या. मात्र त्या सगळ्यांना एक मराठी अभिनेत्री काटे की टक्करदेत होती. जिने भल्याभल्या अभिनेत्रींना पाणी पाजलं. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर तेव्हाची टॉप अभिनेत्री बनली. मराठी असूनही तिने मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींना पछाडलं. चित्रपटांसोबतच ती अनेक मालिकांमध्येही झळकत होती. तिच्या अभिनयाचे आणि रूपाचे अनेक चाहते होते. मात्र करिअरच्या शिखरावर असताना तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे ती तिच्या आयुष्याची लढाई मात्र अर्ध्यातच हरली. त्यानंतर तिच्या पतीने तिच्याच घरच्यांवर उलट आरोप केले होते.

आम्ही बोलत आहोत लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिच्याबद्दल. पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांची ती कन्या होती. तिला लहानपणापासूनच कलेची आवड. त्यामुळेच अगदी बालपणापासूनच तिने थिएटर करायला सुरुवात केली. अभिनय करत असतानाच प्रिया अभिनेते आणि लेखक करण राजदान यांच्या प्रेमात पडली. त्यांनी लग्नही केलं. मात्र अवघ्या ७ वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. प्रिया हिला हा घटस्फोट नको होता. मात्र करण यांच्या जबरदस्तीमुळे तिला घटस्फोट द्यावा लागला. यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. तिनं तिच्या पतीला घटस्फोट घेऊ नये अशी अनेक वेळा विनंती केली होती.

View this post on Instagram

A post shared by Film History Pics (@filmhistorypics)

घटस्फोटानंतर प्रिया खचली

तिच्या पतीच्या आग्रहामुळे घटस्फोट झाला आणि त्यानंतर प्रिया डिप्रेशनमध्ये गेली. २००२ मध्ये कर्करोगाशी झुंजत असताना प्रिया तेंडुलकरचं निधन झालं. करण राजदान यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "मला घटस्फोट हवा होता, पण प्रियाला तो नको होता. आम्ही ११ वर्षे एकत्र होतो. १९९९ मध्ये आमचा घटस्फोट झाला. तो माझ्या आयुष्यातील सर्वात क्लेशाचा काळ होता. आम्ही एकत्र कसं राहू शकतो हे मला समजत नव्हतं. घटस्फोटानंतर तिला कॅन्सरचं निदान झालं. घटस्फोटानंतरही मला तिच्या आजाराबद्दल माहिती होती, ती बरी होत आहे असं मला सांगण्यात येत होतं.'

तो पुढे म्हणाला, 'मग मला दुसऱ्या कोणाचा तरी फोन आला की, ती आता या जगात नाही. कुटुंबाकडून मला काही चुकीची माहिती देण्यात आली होती, पण काय चुकीचं म्हणता येईल, कदाचित त्यांना वाटलं होतं की ती बरी होईल. तिला घटस्फोट घ्यायचा नव्हता, पण मला पाहिजे होता.' घटस्फोटाच्या धक्क्यातून प्रिया कधीच सावरली नाही असं म्हणता येईल. अखेर तिने २००२ मध्ये शेवटचा श्वास घेतला.

दररोज एकजण येतो आणि काहीही बरळून जातो... पांढरा केस जपून ठेवण्यावरून शर्मिष्ठा राऊत ट्रोल; नेटकरी म्हणतात, 'डोक्यात फरक ...'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.