कोल्हापूर जिल्ह्यातील एका मठात राहणाऱ्या हत्तीणीला लोक महादेवी आणि माधुरी या नावानेही ओळखतात. महादेवी नंदिनी मठाचा भाग बनली होती. पण आता कोल्हापूरची महादेवी हत्तीणी अनंत अंबानींच्या वनतारा येथे पाठवण्यात आली आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की हत्तीणी आजारी असल्याने आणि तिची येथे योग्य काळजी घेतली जात नसल्याने तिला वंतारा येथे पाठवण्यात येईल. यानंतर वातावरण तापले आहे. तिला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर प्रयत्न करत आहे. आता या वादात स्टॅण्ड अप कॉमेडीयन कुणाल कामरानेही उडी घेतली आहे. ट्विट करत त्याने अंबानींवर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मठातील लोकांनी महादेवीला निरोप दिला. यावेळी हत्तीणीचे डोळे पाणावले होते. वनतारा येथील पथक हत्तीणीला गुजरातला घेऊन गेले. परंतु हत्तीणी गेल्यामुळे कोल्हापुरातील लोकांनी निषेध करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये असे दिसून आले की लोकांनी अनंत अंबानींचा निषेध करायला सुरुवात केली आहे.
Mahadevi Elephant Latest Video : 'महादेवी'ला मठाने भीक गोळा करायला ठेवलं', पेटाचा गंभीर आरोप; राजू शेट्टींचेही उत्तरस्टॅण्ड अप कॉमेडीयन कुणाल कामराने एक नवीन ट्विट केले आहे. यात त्याने माधुरी हत्तीणी परत आणण्यावर पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अंबानींवर टीका केली आहे. त्याचे हे ट्विट आता व्हायरल झाले होत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. कुणाल कामरा नेहमीच वादात अडकतो. आता यावरूनही वाद पेटण्याची शक्यता आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्येलिहिलंय की, हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा नाही. माधुरी/महादेवी कोल्हापूर..., असं तो म्हणाला आहे.
माधुरी हत्तीणीला परत नेल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही अनंत अंबानींच्या गळ्यात चप्पलांचा हार घालण्यात आला आहे. कपाळावर टिकली आणि नाकात नथ घालून एक पोस्टर तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये हत्ती महादेवीबद्दल लिहिले आहे की, आम्हाला विश्वास आहे की आमची महादेवी परत येईल. इतकेच नाही तर जेव्हा लोकांना हत्ती महादेवी परत आल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही, तेव्हा लोकांचा निषेध आणखी वाढला. लोकांनी जिओ मॉल आणि जिओच्या उत्पादनांवर बहिष्काराचे नारे दिले. लोकांनी जिओ सिम पोर्ट करण्यासही सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.