Solapur Crime : "तू मला आवडतेस" म्हणत बेडरूममध्ये नेऊन विवाहितेवर अत्याचार, सोलापूर हादरलं!
Saam TV August 03, 2025 05:45 PM
  • सोलापूरात भरदिवसा विवाहितेवर घरात घुसून अत्याचार

  • आरोपीने दिली नवऱ्याला आणि मुलाला मारण्याची धमकी

  • पीडितेने घटनेची माहिती पतीला देताच पोलिसांत तक्रार दाखल

  • आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत रवानगी, तपास सुरू

सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेवर भरदिवसा तिच्याच घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरात एकटी असताना, ४८ वर्षीय आरोपी इसमाने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्याने सुरुवातीला महिलेसोबत धक्काबुक्की केली आणि "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत तिला जबरदस्तीने बेडरूममध्ये नेले. महिलेने विरोध करताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

Solapur Crime : जेवत नाही, शाळेत जात नाही म्हणून राग; सावत्र आईने ३ वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

या घटनेनंतर पीडितेने घाबरून जाऊन आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला धमकी दिली की, “घडलेली घटना जर कोणाला सांगितली, तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलाला जिवंत ठेवणार नाही.” या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने काही वेळानंतर आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला. दोघांनी मिळून तात्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

पोलीस विभागाने गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलली. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, आरोपीचा पूर्व इतिहास देखील तपासला जात आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांनी कडक शिक्षा आणि महिलांच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे.

घटना नेमकी कुठे घडली?

ही घटना सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पीडित महिला कोण होती?

पीडित महिला विवाहित असून त्या घटनेच्या वेळी घरात एकट्या होत्या

आरोपीने काय केलं?

आरोपीने भरदिवसा घरात जबरदस्तीने प्रवेश करत महिलेवर बलात्कार केला व नंतर तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी काय कारवाई केली?

पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.