रशियामध्ये मोठा भूकंप येऊन गेलाय. रशियाच्या पूर्वेकडील कामचटका बेटावर घडलेल्या घटनेने संपूर्ण जगाला धक्का बसला. काही देशांमध्ये तात्काळ त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. तर काही देशांमध्ये त्सुनामीच्या लाटाही जाणवल्या. आता परत टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय. रशियाच्या कामचटकामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक बघायला मिळतोय. यानंतर आता शास्त्रज्ञांनी मोठा इशारा दिलाय. अमेरिका, इंडोनिशिया आणि जापानला त्सुनामीचा इशारा देण्यात आला होत्या, त्यामध्येच आता ज्वालामुखीचा उद्रेक बघायला मिळतोय.
ज्वालामुखीचा उद्रेक राखेचे लोट 6 हजार मीटर उंचीवर
क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा उद्रेक पहिल्यांदाच नोंदवण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी कामचटका प्रदेशातील आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाच्या मुख्य संचालनालयाने याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कामचटकामध्ये क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीतूनविसर्ग नोंदवण्यात आला आहे. राखेचे लोट 6 हजार मीटर उंचीवर झाला, ज्याची उंची 1856 मीटर होती. क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीला विमान वाहतूक धोका कोड देण्यात आला होता.
600 वर्षांत क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा हा पहिलाच उद्रेक
600 वर्षांत क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा हा पहिलाच उद्रेक झाल्याचे सांगितले जाते. यामुळे ही अत्यंत मोठी धोक्याची घंटा म्हणावी लागणार आहे. बुधवारी झालेल्या भूकंपामुळे फ्रेंच पॉलिनेशिया आणि चिलीपर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतर कामचटका द्वीपकल्पातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी क्ल्युचेव्हस्कॉयचा उद्रेक झाला होता, त्यानंतर हा उद्रेक झाला असल्याचे बघायला मिळतंय. जपानची मंगा कलाकार रिओ तात्सुकीने जपानमध्ये महाप्रलय येण्याचे भाकीत यापूर्वीच वर्तवले आहे, त्यामध्येच रशियाच्या ज्वालामुखीबद्दलही भाकित केले होते.
इन्स्टिट्यूट ऑफ ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्रांनी दिली मोठी माहिती
इन्स्टिट्यूट ऑफ ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्राच्या टेलिग्राम चॅनेलवर बोलताना गिरिना यांनी म्हटले की, क्रॅशेनिनिकोव्हचा शेवटचा लावा 1463 मध्ये झाला. त्यानंतर परत कधीच याचा उद्रेक हा बघायला मिळाला नाही. आता अचानक ज्वालामुखीचा उद्रेक बघायला मिळाल्याने मोठी खळबळ बघायला मिळतंय. रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाच्या कामचटका शाखेने याबद्दलची माहिती दिली आहे. मात्र, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण सध्या बघायला मिळतंय.