सध्या पृथ्वीवरीर एक सर्वात दुर्गम भाग हा साहसी यात्रांसाठी, लोकांचं हाय डिमांड डेस्टिनेशन बनला आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, पृथ्वीवरील सर्वात दुर्गम भाग असूनही या जागी जाण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यास अनेक लोक तायर आहेत, उत्सुक आहेत. पण असं असलं तरी प्रोफेशनल पायलट मात्र या जागी जाण्यास खूप घाबरतात. काही पायलट्सनी तर या जागेच वर्णन ‘पृथ्वीवरील सर्वात भीतीदायक जागांपैकी एक’असं केलं आहे. न्यूयॉर्क ऑरोरा एक्सपीडिन्स नुसार, सध्याच्या काळात अंटार्क्टिका येथील साहसी यात्रेसाठी लोक खूप उत्सुक आहेत, तिथे जाण्याची अनेकांना इच्छा असते.
त्यामुळे ही जागा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनलं आहे. काही साहसी लोक तर बर्फाळ प्रदेशातील या अभियानासाठी 25 हजार डॉलर्सपेक्षाही अधिक रक्कम खर्च करण्यास तयार आहेत. ध्रुवीय प्रदेशाची खरी अनुभूती घेण्यासाठी आणि पेंग्विन्स पाहण्यासाठी, आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घेण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.
हाय डिमांड तरीही पायलट्सना भीती का ?
मात्र या प्रदेशात जाण्यासाठी हाय डिमांड असूनदेखील अनेक विमानतज्ज्ञ आणि पायलट्स सांगतात की, फ्लाईट टेकऑफ किंवा लँड करण्यासाठी ही पृथ्वीवरील सर्वात भीतीदायक जागांपैकी एक आहे. 54 वर्षांचे वर्षीय रिचर्ड वेल्स हे केंट येथील निवृत्त पायलट आहेत, त्यांनी युरोप, आशिया आणि अमेरिकेत आंतरराष्ट्रीय स्तरावर 22 वर्षांहून अधिक काळ उड्डाण केले. त्यांना 10 हजार तासांहून अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे, तसेच त्यांनी जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या उड्डाण परिस्थितीचा अनुभव घेतला आहे , पण अंटार्क्टिकाचं नाव काढलं की तेही स्तब्ध होतात.
बॅकअप नाही, चूक झाली तर..
“मी डोंगराळ प्रदेशात, दुर्गम बेटांवर आणि उष्णकटिबंधीय वादळांमधून उड्डाण केले आहे. पण अंटार्क्टिका? ते वेगळं आहे. (तिथे)हवामान कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदलते, बहुतेक भागात योग्य धावपट्ट्या नसतात आणि जर काही चूक झाली तर – कोणताही बॅकअप नसतो. कोणतीही रिस्क , जोखीम घेण्यासारखं ते नाही” , असं वेल्स म्हणाले.
जरी या खंडात, मर्यादित संख्येने उड्डाणे, विशेषतः किंग जॉर्ज आयलंडसाठी उड्डाणं होत असतात, तरी त्या फ्लाईट्स अत्यंत नियंत्रित आणि हवामानावर अवलंबून असतात. इथे अचानक व्हाईटआउट, जोरदार वारे आणि जवळजवळ शून्य दृश्यमानता यामुळे विमान उड्डाणात वारंवार विलंब आणि रद्द होतात. व्यावसायिक विमान कंपन्या तर अंटार्क्टिका येथे उड्डाण करतच नाहीत. या प्रदेशात फक्त अत्यंत स्पेशल चार्टर्ड फ्लाईटसची उड्डाणं किंवा लष्करी आणि वैज्ञानिक मोहिमा चालतात.
रिस्क नकोच
” तिथे कोणतीच, अगदी छोटीशीही चूक चालू शकत नाही. (तिथे) पायाभूत सुविधा कमी आहेत आणि उड्डाणादरम्यान परिस्थिती बिघडल्यास अनुभवी विमान कर्मचाऱ्यांकडेही मर्यादित पर्याय असतात. त्यामुळे मी कधीही इथे उड्डाण करण्याचा चान्स घेणार नाही, जुगार खेळणार नाही” असं वेल्स पुढे म्हणाले.
दृश्यमानता आणि धावपट्टीच्या समस्यांव्यतिरिक्त, हवाई वाहतूक नियंत्रणाचा अभाव, अनप्रेडिक्टेबल जेट स्ट्रीम आणि इमर्जन्सी डायव्हर्जन मार्गांचा अभाव,यामुळे इथे उड्डाणाचा धोका वाढतो. मात्र विमान वाहतुकीच्या आव्हानांना न जुमानता, दरवर्षी हजारो ब्रिटिश पर्यटकांसाठी अंटार्क्टिका हे एक स्वप्नवत ठिकाण ठरत असून इथे येण्याची कित्येकांची इच्छा असते. .