Madhuri the elephant was transferred from Kolhapur to Gujarat's Vantara project as per court orders : कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आलं आहे. मात्र, या निर्णयाला गावकऱ्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. आमची माधुरी आम्हाला परत द्या, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आहे. महत्त्वाचे म्हणजे वनतारानेही माधुरीला परत देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच यासंदर्भात मंगळवारी राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
याशिवाय कोल्हापूरमधील नेत्यांनीही वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माधुरी हत्तिणीला कोल्हापुरात परत येईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे. पण जर माधुरी हत्तिणीला परत कोल्हापुरात आणायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रकिया पार पाडणे गरजेचं आहे.
Madhuri Elephant: वनतारामध्ये जंगली प्राण्यांची तस्करी, अनेकांचा मृत्यू अन्...; खळबळजनक आरोप करत राजू शेट्टींचा महत्त्वाचा सवालतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर माधुरीला कोल्हापुरात परत आणायचं असेल तर वन्यजीव खात्याने तसेच जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल करणं आवश्यक आहे. त्यानंतर जर न्यायालयाने तसा आदेश दिला, तर माधुरी हत्तिणीला कोल्हापुरात परत आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. न्यायालयाच्या आदेशातनंतर माधुरी हत्तिणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञांच्या हाताळणीत सुरक्षितरीत्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, वनताराने यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ''आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे नुसार करण्यात आली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. महादेवीला वनतारामध्ये स्थलांतरीत करण्यासाठी आरंभकर्ता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही जबाबदारी घेऊन देखभाल करत आहोत'', असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
Madhuri Elephant: वनतारामध्ये जंगली प्राण्यांची तस्करी, अनेकांचा मृत्यू अन्...; खळबळजनक आरोप करत राजू शेट्टींचा महत्त्वाचा सवालतसेच ''जनतेच्या तीव्र पडसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबद मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गे माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल'', असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.