काळेवाडी, ता. ५ : मुदत ठेवीवर कर्ज काढून रहाटणी येथील साई लक्झुरिया सोसायटीने ३६ किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पामुळे सोसायटीची लाखो रुपयांच्या वीज बिलापासून कायमची मुक्तता होणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी साई लक्झुरिया सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, सचिव संदीप क्षत्रिय, खजिनदार पंकज जाजडा, सतीश काळे, राकेश मुसळे, राज देशमुख, अजय बाचकर, प्रवीण कुलकर्णी, जयप्रकाश टमोटिया, नवनीत देवांगण, प्रल्हाद अडसर, राहुल गांधी यांच्यासह इतर सर्व सदस्य व रहिवासी उपस्थित होते.