अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाच सामन्यात मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. खासकरून जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत त्याने संघाला अपेक्षित गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याचा प्रभाव दिसून आला. शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर दबाव असून त्याने भेदक गोलंदाजी केली. या मालिकेत त्याने 23 विकेट घेतल्या. असं असताना मोहम्मद सिराजला त्याच्या पहिल्या कसोटी कर्णधाराने सलाम ठोकला आहे. अजिंक्य राहणेच्या नेतृत्वातच मोहम्मद सिराजने पदार्पण केलं होतं. त्याने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळला होता. अजिंक्य रहाणेने मोहम्मद सिराजबाबत एक खुलासा केला आहे. त्याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे. अजिंक्य रहाणेने आपल्या युट्यूब चॅनेवर त्याचं कौतुक करताना ही बाब सांगितली. त्याने सांगितलं की, मोहम्मद सिराजचा राग आणि आक्रमकता त्याच्या कामगिरीत सर्वोत्तम देते.
अजिंक्य रहाणेने मोहम्मद सिराजबाबत खुलासा केली की, पदार्पणाच्या मालिकेत सिराज नाराज झाला होता. रहाणेच्या कर्णधारपदाखाली खेळताना त्याला अडचणीचा सामंना करावा लागला होता. रहाणेने सांगितलं की, ‘मला सिराजची एक बाब खूपच आवडते. ती म्हणजे त्याचं दीर्घकाळ गोलंदाजी करणं. 2020-21 च्या मालिकेतही त्याने वेगाने गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियात.. तेव्हा त्याने पदार्पण केलं होते. तेव्हा तो माझ्यावर नाराज होता. कारण मी त्याला गोलंदाजी देण्यासाठी उशीर केला होता.’ अजिंक्य रहाणेने पुढे सांगितलं की, ‘त्याच्या अंगात अजूनही तोच राग आहे. तो रागच त्याचं सर्वोत्तम कामगिरी घडवते. आम्ही इंग्लंड मालिकेत हे पाहीलं आहे. त्याच्या गोलंदाजीत आक्रमकता आणि ज्या वेगाने गोलंदाजी करतो, तो पहिल्या चेंडूपासून तयार असतो. एका महान गोलंदाजाचं लक्षण आहे.’
सिराजमध्ये हा बदल दिसलाअजिंक्य रहाणेने सिराजबाबत आणखी एक बाब अधोरेखित केली. सिराज क्षेत्ररक्षण लावण्यात पटाईत झाला आहे, असं अजिंक्य रहाणे म्हणाला. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत त्याने चांगली गोलंदाजी केली. तसेच त्याने जबाबदारी घेतली. क्षेत्ररक्षण लावण्यात त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, ओव्हल कसोटीत मोहम्मद सिराजने एकूण 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात 4 आणि दुसर्या डावात 5 गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडिया ओव्हल कसोटी 6 धावांनी जिंकली. या विजयासह मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.