आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्रात महिलांच्या स्वभावाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
चाणक्य म्हणतात की, कुटुंबाला बनवण्यात किंवा बिघडवण्यात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. गुणी आणि सुसंस्कृत महिला कुटुंबाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते, तर अवगुणी महिला कुटुंबाचा विनाश करू शकते.
चाणक्यांच्या मते, शिक्षण कुटुंब आणि समाजात सकारात्मक बदल घडवते. शिक्षित आणि बुद्धिमान महिला कुटुंबाचा विकास करते, तर अशिक्षित महिलेमुळे कुटुंबात अवगुणांचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे कुटुंब आणि समाजाचे नुकसान होऊ शकते.
चाणक्य सांगतात की, लालच हा अवगुण कोणत्याही व्यक्तीला बर्बाद करू शकतो. विशेषतः जर एखाद्या महिलेमध्ये लालच असेल, तर ती कुटुंबातील शांती नष्ट करू शकते. अशा महिलेच्या स्वभावामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो.
अहंकार हा मानवाचा शत्रू आहे, असे चाणक्य म्हणतात. जर एखाद्या महिलेमध्ये अहंकार असेल, तर ती आपले ज्ञान आणि बुद्धीचा योग्य वापर करू शकत नाही. यामुळे कुटुंबातील सुख-समृद्धी नष्ट होते.
चाणक्यांच्या मते, खोटे बोलणे हा अवगुण असलेली महिला कुटुंबाला धोका निर्माण करू शकते. अशा महिलांचा खोटेपणा कुटुंबातील विश्वास नष्ट करतो आणि सततच्या भांडणांमुळे कुटुंबाची एकता तुटते.
स्त्रियांमध्ये असते आठपट कामभावना? चाणक्यने सांगितले 4 गुण
हेही वाचा -