Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही
esakal August 09, 2025 08:45 AM

अंबड - आमच्या महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या काळात संकल्प केला होता की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजपंप आहे. अशा शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष वीज पंपाचे बील येणार नाही. यामध्ये चांद्यापासून ते बांध्यापर्यंत, जालना पासुन नागपूर व कोल्हापूर पासुन ते सिन्दुर पर्यंतच्या शेतकऱ्याला बील भरण्याची गरज भासणार नाही.

याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणीला दीड हजार रूपये देणार आहे. मात्र त्यात वाढ करून 2100 रूपये सरकार देणार आहे. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी जालना जिल्हयातील अंबड शहरातील श्री मत्स्योदरी मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. 8) जिल्हास्तरीय महसूल सप्ताह व छत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियान सांगता समारंभाप्रसंगी बोलताना केले.

याप्रसंगी व्यासपिठावर भारतीय जनता पार्टीचे जालना ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष तथा आमदर नारायण कुचे,आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी अमिषा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल,माजी आमदार विलासराव खरात, बाजार समितीचे सभापती अवधूत खडके यांची प्रमूख उपस्थिती होती.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, विद्यार्थ्याना विवीध शैक्षणीक कागदपत्रे, दाखले मिळविण्यासाठी पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागत होता. आता विद्यार्थ्याना कोणताही दाखला मिळविण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर देण्याची गरज नाही.

याचबरोबर मोदी सरकारने तीस लाख पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले. त्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे काम सरकारने केले आहे. असे हि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कूचे यांनी बोलताना शहरातील मत्स्योदरी देवीच्या मंदीर विकास कामासाठी तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी याप्रसंगी बोलताना केली.

याप्रसंगी कार्यक्रमाला सतीश घाडगे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंह ठाकुर, देविदास कुचे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत खडके,अरुण उपाध्ये, औदुंबर बागडे, प्रदीप पवार, केदार कुलकर्णी, सौरभ कुलकर्णी, रवींद्र तौर, रमेश पैठणे, तारीख चाऊस, विठ्ठलसिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत पारदे, तहसीलदार विजय चव्हाण साहेब, घनसावंगी तहसीलदार मनीषा सोनवणे,गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी पंडित भुतेकर, आर. डी. सी. चे गणेश महाडिक, डॉ.राहुल डोंगरे, सचिन जाधव, सुरेश गुडे,बबनभाऊ बुंदेलखंडे, फिरोज शेख, गंगाधर वराडे, विठ्ठलसिंह राजपूत, काकासाहेब कटारे, संदीप खरात, बाळू खरात, नसीर बागवान शेख शकील, प्रल्हाद उगलेसह सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी शेतकरी बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे हस्ते महसुलचे अधिकारी, कर्मचारी व बचत गटाच्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.